करंजी (वार्ताहर) -

सध्या करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. पाथर्डी तालुक्याचे

मध्यवर्ती ठिकाण असणार्या तिसगाव येथे सुरू करण्यात येणार्या कोव्हिड सेंटरसाठी मदत केली जाईल. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पीपीईकीटसह करोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या बैठकीमध्ये दिली.

पाथर्डी तालुक्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री तनपुरे यांनी कोल्हार, करंजी, तिसगाव या गावांना धावती भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या बैठकीत तिसगावमध्ये 20 अॅक्टिव्ह रुग्ण असून पीपीईकिट कमी प्रमाणात मिळत असल्याचे येथील आरोग्य अधिकार्यांनी सांगितले. मंत्री तनपुरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांशी संपर्क साधून तिसगाव आरोग्य केंद्राला पीपीईकिटसह लसीची कमतरता भासू देऊ नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या. तसेच येथील कोव्हिड सेंटरला तात्काळ बेड उपलब्ध करून देणार असून कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असे तनपुरे यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून याठिकाणी 50 खाटांचे कोव्हिड सेंटर उभारले जाणार असून या उपक्रमाचे मंत्री तनपुरे यांनी कौतुक करत याठिकाणी येणार्या रुग्णांना जेवण, मेडिसिन व बेडची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी तिसगाव ग्रामपंचायतचे देखील मोठे सहकार्य राहणार असल्याचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे, सरपंच काशिनाथ पाटील लवांडे,माजी सरपंच इलियास शेख, सुनील पुंड,सरपंच अमोल वाघ, रवींद्र मुळे, युवानेते बाबासाहेब बुधवंत, ग्रामपंचायत सदस्य पापाभाई तांबोळी, नाथा वाबळे, भाऊसाहेब लवांडे, सुनील लवांडे, डॉ. अर्चना लांडे, डॉ. होडशिळ यांच्यासह आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका ,मदतनीस आशा सेविका उपस्थित होत्या.

सामाजिक अंतर राखत बाधितांशी संवाद

तिसगाव आरोग्य केंद्रात करोना रुग्ण संख्येच्याआढावा बैठकीनंतर राज्य मंत्री तनपुरे यांनी सामाजिक अंतर ठेवत येथील करोना बाधित रुग्णांशी संवाद साधत घाबरू नका, काळजी घ्या, अशा शब्दांत त्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याने करोना रुग्णांच्या चेहर्यावरील तणाव काही प्रमाणात नक्कीच निवळला.