पाणलोटातील पाऊस ओसरला

निळवंडेतून विसर्ग सुरूच, मुळातील पाणीसाठा 67 टक्के || डिंभे 69, घोडमध्ये 78 टक्के पाणीसाठा
पाणलोटातील पाऊस ओसरला

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला आहे. धरणाकडे होणारी आवक मंदावली असलीतरी पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सोडण्यात येत आहे.

भंडारदरात गत बारा तासांत 155 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्या सर्व पाण्याचा वापर करण्यात आला. 3598 क्युसेकने सुरू असलेले पाणी खाली निळवंडेत जमा झाले आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 9498 दलघफू (86.03) होता. काल दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 11 मिमी झाली आहे. निळवंडेतील पाणीसाठा 6864 दलघफू (82.42टक्के) असून प्रवरा नदीत 5367 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

भंडारदरा पाणलोटात काल सकाळपर्यंत नोंदवला गेलेला पाऊस असा (मिमी)-भंडारदरा 26, घाटघर 54, रतनवाडी 49, वाकी 17. मुळा पाणलोटातही पावसाचा जोर ओसरला आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 17446 (67.10 टक्के) झाला होता. कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 3212 क्युसेक होता

डिंभे 69, घोडमध्ये 78 टक्के पाणीसाठा

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे धरणांमधील एकूण पाणीसाठा (18600 दलघफू) 64 टक्क्यावर गेला आहे.

गत वर्षी याच काळात केवळ 6520 दलघफू (22टक्के) पाणीसाठा होता. पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असलातरी अधूनमधून कोसळणार्‍या पावसामुळे डोंगरदर्‍यातून अजूनही पाण्याची आवक सुरू आहे.

येडगाव धरणात 94, माणिकडोह 57, वडज 78, पिंपळगाव जोगे 57, डिंभे 6* टक्के भरले आहे. पाणीसाठा मुबलक अल्याने येडगाव सांडवा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com