पाणलोटातील पाऊस ओसरला

विसर्ग (मिमीमध्ये) - भंडारदरा 2365, निळवंडे 12083, गोदावरी 39172, मुळा 10000
पाणलोटातील पाऊस ओसरला

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा पाणलोटात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडण्यात येणारा विसर्ग घटला आहे. त्यामुळे नद्यांमधील पाणीही आता कमी होत आहे.

11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. काल या धरणातून 10219 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पण बुधवारी पाऊस कमी झाल्याने आता केवळ 2365 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र निळवंडे धरणातून काल सायंकाळी 12083 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. या धरणात 7218 दलघफू पाणी आहे.

हरिश्चंद्र गड, आंबित यासह पाणलोटातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे मुळा नदीतील कातूळ येथील विसर्ग 5016 क्युसेक होता. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 25245 (97.09टक्के) कायम ठेवून 10000 क्युसेकने पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे. आज धरणाकडे येणारी आवक आणखी मंदावणार आहे. राहाता तालुका प्रतिनिधीने कळविले की, नाशिकमधील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर काहिसा ओसरला असला तरी धरणातून सोडण्यात येणारे विसर्ग टिकून आहेत. त्यामुळे गोदावरीतील विसर्ग 39172 क्युसेक ने सुरु आहे.

कुकडी 84 टक्के

कुकडी प्रकल्प अंतर्गत धरणांमधील एकूण पाणीसठा 24899 दलघफू(84टक्के) झाला आहे. गत 24 तासांत 1146 दलघफू पाण्याची आवक झाली. वडज, डिंभे आणि पिंपळगाव जोगे धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com