जिल्ह्यात पाणलोटासह लाभक्षेत्रात श्रावणसरी

भंडारदरा, मुळा, कुकडीत नवीन पाण्याची आवक सुरू
जिल्ह्यात पाणलोटासह लाभक्षेत्रात श्रावणसरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गत तीन दिवसांपासून श्रावणसरी कोसळत असल्याने दुबार पेरणीचे संकट (Crisis of double sowing) घोंगावत असलेल्या नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) खरीप पिकांना ( Kharif crops) दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर सिंचनाच्या आवर्तनाची सोय होणार आहे. काल गुरूवारी मुळा (Mula), भंडारदरा धरणांच्या (Bhandardara Dam) पाणलोटासह लाभक्षेत्रात सर्वदूर पाऊस कोसळत होता. अजून काही दिवस पाऊस पडेल असा अंदाज मुंबई हवामान खात्याने (Mumbai Meteorological Department) दिला आहे. या पावसामुळे पाणलोटातील जनजीवन गारठून गेले आहे. जिल्ह्यातही गारवा निर्माण झाला आहे.

भंडारदरा पाणलोटात (Bhandardara watershed) काही दिवसांपासून पावासाने दांडी मारली होती. त्यामुळे धरणात येणारे पाणी बंद झाले होते. भंडारदरा (Bhandardara) पूर्ण क्षमतेने भरेल अशी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण गत तीन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाल्याने धरणात हळूवार नवीन पाण्याची आवक (water Inward) होत आहे. काल या धरणात (Dam) 67 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली.

काल दिवसभरात पावसाचा काहीसा जोर होता. या पावसाची नोंद 19 मिमी झाली आहे. घाटघर, पांजरे, रतनवाडीत पावसाचा काहीसा जोर वाढला होता. मुळा पाणलोटातही रिपरिप सुरू आहे. मुळा धरणात 940 क्युसेकने आवक होत आहे.

श्रीरामपूर (Shrirampur), कोपरगाव (Kopargav), शिर्डी (Shirdi) व अन्य ठिकाणी बुधवारी मध्यरात्रीपासून पाऊस कोसळत होता. गत तीन दिवसांपासून या भागात सूर्यदर्शन झालेले नाही. या पटडणार्‍या पावसामुळे कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean), मका (Maize), मूग (Moong), उडीद (Urad), तूर (toor) या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. राहुरी, नेवासा, पारनेर, जामखेड आणि शेवगावात दिवसभर रिमझीम सुरू होती. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.

कुकडी पाणलोटातही (Kukadi Watershed) पावसाची रिपरिप सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत या प्रकल्पात 160 दलघफू नवीन पाण्याची भर पडली. या समूहातील धरणांमधील एकूण पाणीसाठा (Water Storage) 17879 दलघफू आहे. गतवर्षी या प्रकल्पात 16215 दलघफू पाणीसाठा (Water Storage) होता. यंदा या प्रकल्पात एकूण 21499 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. पण आवर्तन सोडण्यात आल्याने धरणातील पाणीपातळी कमी झालेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com