पाणलोटात धो-धो पाऊस

मुळा निम्मे भरले, भंडारदरा 75 टक्के भरणार
पाणलोटात धो-धो पाऊस
पाऊस File PhotoRain

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा (Bhandardara), मुळा पाणलोटात (Mula watershed) गत दोन दिवस विश्रांती घेतलेल्या आषाढ सरींनी पुन्हा तांडव सुरू केल्याने दोन्ही धरणांत जोरदार पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुळा धरण (Mula Dam) आज सकाळी भरलेले असेल. तसेच पावसाची जोरदार बॅटिंग अशीच सुरू राहिल्यास आज रात्री उशीरापर्यंत भंडारदरा धरण (Bhandardara Dam) 75 टक्के भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गत आठवड्यात चार दिवस पाणलोटात जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे भंडारदरातील साठा तासागणिक वाढत होता. त्यानंतर या पावसाने शुक्रवार आणि शनिवार काहीशी विश्रांती घेतल्याने धरणातील नवीन पाण्याची आवक मंदावली होती. पण रविवारी सकाळपासून पावसाने जोर पकडला. त्यामुळे धरणात गत बारा तासांत 226 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने पाणीसाठा 7238 (65.57 टक्के) झाला होता.

भंडारदरासह घाटघर (Ghatghar), पांजरे (Panjare), रतनवाडीत (Ratanwadi) धो धो पाऊस कोसळत असल्याने धरणात जोरदार पाण्याची आवक होत आहे. आज विक्रमी पाण्याची आवक होणार असून हे धरण 75 टक्के भरण्याची शक्यता आहे. भंडारदरा (Bhandardara) येथे रविवारी दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 47 मिमी झाली आहे. वाकी तलावातून 729 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने व अन्य पाणीही निळवंडेत (Nilwande) जमा होत असल्याने या धरणातील पाणीसाठाही वाढू लागला आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 2200 (26.24 टक्के) झाला होता. आज या धरणातील पाणीसाठा 30 टक्क्याच्या पुढे जाणार आहे. साम्रद येथील मारूती निवृत्ती रोगटे या शेतकर्‍याची दुभती म्हैस अतिवृष्टीने मृत्यू पावली.

मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गट, आंबित, पाचनईत अधूनमधून आषाढ सरी जोरदार कोसळत आहेत. त्यामुळे मुळा नदीचे पाणी वाढत असल्याने आज धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होण्याची शक्यता आहे. मुळा नदीचा विसर्ग कोतूळ येथे सकाळी 5327 क्युसेक होता. त्यात सायंकाळी वाढ होत तो 6260 क्युसेक होता. रात्री उशीरा हा विसर्ग 10 हजाराच्या आसपास होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मुळा नदीवरील आंबित, पिंपळगाव खांड, कोथळे, शिरपुंजे आणि बलठण ही छोटी धरणं ओव्हरफ्लो झाल्याने मुळा नदीला पाणी वाढत आहे. मुळा धरणातील पाणीसाठा काल सकाळी 12568 दलघफू होता. तो सायंकाळी 12837 दलघफूवर पोहचला. पाण्याची आवक लक्षात घेता आज सकाळी हे धरण निम्मे झालेले असेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com