भंडारदरा धरणाचे विधिवत जलपूजन; महाविकास आघाडीतील काहींची अनुपस्थिती

तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण
भंडारदरा धरणाचे विधिवत जलपूजन; महाविकास आघाडीतील काहींची अनुपस्थिती

अकोले | प्रतिनिधी

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेखा असणाऱ्या भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) आज मंगळवारी आ. डॉ. किरण लहामटे (MLA Dr Kiran Lahamte) यांच्या हस्ते विधिवत शासकीय जलपूजन करण्यात आले.

भंडारदरा धरणाचे विधिवत जलपूजन; महाविकास आघाडीतील काहींची अनुपस्थिती
Video : रंधा फॉलचे विहंगम, नयनरम्य दृश्य

यावेळी अगस्ती कारखान्याच्या (Agasthi sugar factory) वतीने कारखान्याचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान ज्येष्ठ संचालक सिताराम पाटील गायकर व आ. डॉ.लहामटे यांच्या हस्ते प्रवरामाईला साडी, चोळी, श्रीफळ अर्पण करण्यात आले. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांसह भांगरे गट अनुपस्थित राहिल्याने या कार्यक्रमानंतर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.

यावेळी कारखाण्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाशराव मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, उद्योजक सुरेशराव गडाख, महेशराव नवले, बाळासाहेब ताजणे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव खांडगे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, महिलाध्यक्षा स्वातीताई शेणकर, ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी, प्रा.सी.एम.नवले, भागवत शेटे, संदीप शेणकर, बाळासाहेब भांगरे, भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांचेसह महिला कार्यकर्त्या व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या शासकीय जलपूजन संदर्भात काल सोमवारी सोशल मीडियावर महाविकास आघाडीच्या वतीने निमंत्रणाचे मेसेज फिरत होते. मात्र या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांचेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेनेचे कुणीही महत्वाचे तालुक्यातील पदाधिकारी या शासकीय जलपूजन कार्यक्रमास उपस्थित नव्हते. यावरून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी अकोले तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणावर आघाडीत बिघाडी व असंतोष खदखदत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com