गोदावरीच्या कालव्यांना पाणी सोडले

गोदावरीच्या कालव्यांना पाणी सोडले
file photo

अस्तगाव (वार्ताहर) -

अखेर काल गुरुवारी सकाळी 8 वाजता गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना आवर्तनासाठी पाणी सोडण्यात आले

आहे.

काल सकाळी 8 वाजता गोदावरीचा राहाता भागाकडे वाहणारा उजवा कालवा 300 क्युसेक तर कोपरगावच्या दिशेने वाहणारा डावा कालवा 200 क्युसेकने सोडण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने दोन्ही कालव्यांत काहीशी वाढ होऊ शकते. नांदूर मधमेश्‍वर बंधार्‍यातून या कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. या बंधार्‍यातून जलद कालव्याला 8 एप्रिलला आवर्तन सोडण्यात आले आहे. हा कालवा 800 क्युसेक वेगाने वाहत आहे. या कालव्यांसाठी दारणातून 700 क्युसेकने तर मुकणेतून 1000 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरीच्या दोन्ही कालव्यांचे आवर्तन 15 एप्रिल ते 15 मे असे महिनाभर चालणार आहे. यासाठी 3.5 ते 4 टिएमसी पाण्याचा वापर होऊ शकतो. उर्वरित पाण्यातून 15 मे नंतर लगेचच त्यानंतरचे उपलब्ध पाण्यावर दुसरे आवर्तन सुरू होऊ शकते. याची तयारीही जलसंपदा विभागाने केली आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तसा आग्रह धरला आहे.

काल गुरुवारी सकाळी 8 वाजता सोडलेले पाणी राहाता अस्तगाव परिसरात रविवार सकाळपर्यंत दाखल होईल, असा अंदाज आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com