नगराध्यक्ष वहाडणे आमदारांचे बाहुले

पावसाळ्यात शहरवासियांना बारा दिवसाआड पाणीपुरवठा
नगराध्यक्ष वहाडणे आमदारांचे बाहुले
नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

आषाढी एकादशी, बकरी ईद, गुरूपौर्णिमा हे सण लक्षात घेऊन शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात नियोजन करावे म्हणून सातत्याने प्रयत्न करत असतानाही नगराध्यक्ष वहाडणे (mayor Vijay Vahadane) आमदार काळेंच्या (MLA Ashutosh kale ) हातातील बाहुले बनून त्यांच्याच तालावर नाचत आहेत. त्यामुळेच ऐन पावसाळ्यात बारा दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा बाका प्रसंग उद्भवत आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध (Protest) करत असल्याचे पत्रक पाणीपुरवठा सभापती सुवर्णा विवेक सोनवणे (Water Supply Speaker Suvarna Vivek Sonawane) यांनी काढले आहेे.

आ. काळे (MLA Ashutosh kale ) व त्यांच्या बगल बच्च्यांनी निळवंडे बंदिस्त पाईपलाईनला (Nilwande closed pipeline) घातलेला खोडा आणि 42 कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) यांच्या निष्क्रीयतेमुळे रखडल्यानेच शहरवासियांवर ही वेळ येऊन ठेपली असल्याची टीका (Criticism) त्यांनी केली आहे.

सौ. सोनवणे यांनी पत्रकात म्हटले आहे, उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शहरवासियांना 3 ते 4 दिवसाआड पाणी द्यावे म्हणून मागणी केली आहे. शहर विकासाच्या प्रत्येक ठरावाला पालिका सभागृहात भाजपा-सेना नगरसेवक (BJP Shivsena Corporators) गटनेत्यांनी मंजुर्‍या दिल्या आहेत. असे असताना नाकर्तेपणा लपविण्यासाठी बारा दिवसाआड पाणीपुरवठा करून त्याला मूकसंमती देण्यांचे पाप नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून पाचव्या साठवण तळ्याचे गाजर दाखवून शहरवासियांना झुलवत ठेवले, दुसरीकडे निळवंडे (Nilwande) बंदीस्त पिण्याच्या पाणी योजनेला न्यायालयाच्या आडून अनेकांना अप्रत्यक्षरित्या सहकार्य करून ही योजना बासनात गुंडळण्याचे पाप केले.

तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी 42 कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेसाठी वाढीव साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणूनही सत्ताधारी नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या बगलबच्च्यांच्या निष्क्रीयतेमुळे ही पाणी योजना रखडली. याला सर्वस्वी सत्ताधारी नगराध्यक्ष विजय वहाडणे हेच जबाबदार आहेत.

शहरवासियांना आगामी काळात येणार्‍या सणासुदीच्या काळात नियमीत सुरळीत पाणीपुरवठा करता येऊ शकतो पण शहरवासियांना विकासाच्या नावाखाली दाखविलेली सगळी स्वप्ने खोटी ठरायला लागल्यामुळे आमदार आशुतोष काळे (MLA AShutosh Kale), नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) यांना पुढे करून त्यांच्या नथीतून तीर मारत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com