खासदारांच्या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे पितळ झाले उघड

प्रत्येक तालुक्यात कोणत्या योजनेतून आतापर्यंत झालेल्या पाणी योजनांची माहिती मिळेणात
खासदारांच्या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे पितळ झाले उघड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्राच्या जलजीवन मिशन (Jaljivan Mission) या योजना आढावा घेण्यासाठी झेडपीत (ZP) आलेल्या खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी पाणी पुरवठा विभाग (Water Supply Department) आणि तालुक्याच्या गटविकास अधिकार्‍यांकडे आतापर्यंत प्रत्येक तालुक्यात किती योजना झाल्या याची माहिती विचारली. मात्र, जिल्ह्यातील कोणत्याच गटविकास अधिकार्‍यांना ही माहिती सांगता आली नाही. यामुळे संतप्त (Angry) झालेल्या खासदार यांनी आठ दिवसांत तालुकानिहाय झालेल्या पाणी योजनांची माहिती, नादुरूस्त असणार्‍या योजना आणि त्या दुरूस्त करण्यासाठी आवश्यक असणार्‍या निधीची (Fund) याची माहिती तोंडपाठ करून, त्याची यादी तयार करून पुढील बैठकीला येण्याचे आदेश (Order) पाणी पुरवठा विभाग आणि तालुक्याच्या गटविकास अधिकार्‍यांना दिले.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पाणी पुरवठा विभागाकडून (Water Supply Department) 34 अभियान अथवा प्रकारातून पाणी योजना साकारालेल्या आहेत. यात गावनिहाय कोणत्या गावात किती योजना झाल्या, त्यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून किती निधी खर्च झाला. विद्यमान स्थितीत त्या चालू आहे की बंद आहेत. बंद असल्यास त्या दुरूस्त करण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे. जलजीवन मिशन योजना राबवितांना संबधीत गावात राबविण्यात आलेल्या आधीच्या योजनांची माहिती, कागदपत्रे, योजनेची नावे याबाबत खा. विखे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पाणी पुरवठा विभागाचे (Water Supply Department) अधिकारी आणि तालुक्याच्या गटविकास अधिकार्‍यांना विचारली.

मात्र, याबाबत कोणतीच माहिती संबंधीत अधिकार्‍यांना देता आली नाही. यामुळे खा. विखे चांगलेच भडकले. दुसरीकडे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनचा देखील अधिकारी खेळ करत असल्याचे यावेळी समोर आले. कर्जत तालुक्यात जलजीवन मिशनमध्ये 64 गावांचा डीपीआर तयार असतांना त्यातील कवेळ 50 योजना निविदा प्रक्रियेपर्यंत पोहचल्या असून यातील केवळ 27 योजनांची माहिती शासनाला कळविण्यता आलेली आहे. म्हणजे मुबलक निधी असतांना केवळ लालफितीच्या आणि अधिकार्‍यांचा निष्काळपणाचा फटका पाणी योजनांना बसत असल्याचे यावेळी समोर आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह पाणी पुरवठा विभाग आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, खा. विखे यांनी अधिकार्‍यांना येणार्‍या अडचणीची यादी तयार करा, गरज वाटल्यास मी देखील खासगी यंत्रणेची मदत घेवून जलजीवन पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र, हे करत असतांना लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी न पडता कामे करत अन्यथा या विरोधात मला केंद्र सरकारकडे पत्र व्यव्हार करण्याची वेळ येवू देवू नका. मुबलक निधी असतांना कामे पूर्णत्वाकडे का जात नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच पाणी योजनांचे उद्घाटन करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी ठरवून घ्यावेत, शक्यतो जलजीवन मिशनमधील योजना या सोलरवर चालतील असे पाहवे, अशी सुचना यावेळी खा. विखे यांनी दिली.

साधारण काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आतापर्यंत जिल्ह्यातील कोणत्या गावात कोणत्या योजनेतून पाणी पुरवठ्याच्या स्किम झाल्या याची माहिती संकलित करण्याचा ठराव घेण्यात आला होतो. त्यावेळी जिल्ह्यातील पाणी योजनांची हिस्ट्री शीट तयार करण्याचा निर्णय होवून देखील पाणी पुरवठा विभागाने कोणतीच कार्यवाही केली नव्हती. पाणी योजनांचे हिस्ट्री शीट तयार न झाल्याने आजही जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांवर किती खर्च झाला याबाबत पाणी पुरवठा विभागच अंधारात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com