रिक्त जागांमुळे पाणीपुरवठा विभागाच्या तोंडालाच कोरड!

कार्यकारी अभियंत्यासह सात विभागापैकी सहा विभागात प्रभारी राज
रिक्त जागांमुळे पाणीपुरवठा विभागाच्या तोंडालाच कोरड!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला सध्या प्रमुख अधिकार्‍यांच्या रिक्त जागांचे ग्रहण लागलेले आहे. या विभागात गेल्या सहा महिने ते वर्षभरापासून कार्यकारी अभियंता ते उपअभियंता यांची पदे रिक्त आहे. यामुळे या विभागाचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनान समोर आहे.

जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभाग हा महत्वाचा विभाग असून जिल्ह्यात नव्याने पाणी योजना तयार करून त्यांची उभारणी करणे, पाणी योजनांची देखभाल दुरूस्तीसह अन्य कामे या विभागाच्यावतीने करण्यात येतात. या विभागाचे जिल्ह्यात ग्रामीण भागात कामकाज सुरळीत करण्यासाठी सात विभाग आहेत. या यात विभागातील सहा विभागात उपअभियंतांची पदे रिक्त आहेत. यात राहुरी, संगमनेर, पारनेर, श्रीरामपूर आणि जामखेड यासह अन्य एका विभागात अधिकारी नाहीत.

पाणी पुरवठा विभागातील उपभियंत्याच्या पदावर शाखा अभियंत्याना चार्ज देण्यात आलेला आहे. यासह जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता पदावर श्रीरामपूर विभागाचे उपअभियंता प्रकाश खताळे यांना प्रभारी चार्ज देण्यात आला होता. साधारण आठ ते दहा महिने त्यांनी त्याठिकाणी प्रभारी कार्यकारी अभियंत्या म्हणून काम केल्यानंतर मागील आठवड्यात त्यांची पुणे जिल्हा परिषदेत पदोन्नतीने बदली झालेली आहे. यामुळे हे पद देखील आता रिक्त झाले आहे. यासह पाणी पुरवठा यांत्रिकी विभागातील दोन पदांपैकी एक पद रिक्त असून भूजल सर्वेक्षण विभागातील कनिष्ठ भू वैज्ञानिकांची दोन पदे आणि सहायक भू वैज्ञानिक यांचे एक पद रिक्त आहे. या रिक्त पदामुळे पाणी पुरवठा विभागाचा गडा हा कनिष्ठ अधिकार्‍यांच्या खांद्यावर सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात 1999 पासून नव्याने इंजिनीअर पदाची भरती झालेली नाही. यामुळे या ठिकाणी कामकाज करणे कठी झाले असल्याचे काही उपअभियंत्यांनी सांगितले. सरकार पाणी पुरवठा विभागा कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती करत असून त्यांना कर्मचार्‍यांना अनुभव नसून त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने मोठी अडचण निमार्ण झाली आहे. शासकीय सेवेतील आणि अनुभवी इंजिनिअर यांची पदोन्नती झाल्यावर ते बदलू गेल्यानंतर पाणीपुरवठा विभागात कामकाजाचा मोठा तांत्रिक प्रश्न निर्माण होणार आहे.

Related Stories

No stories found.