...असा आहे धरणसाठा; पाहा धरणांची टक्केवारी

...असा आहे धरणसाठा; पाहा धरणांची टक्केवारी
गंगापूर धरण Gangapur Dam Nashik

अस्तगाव | वार्ताहर

दारणा, गंगापूरच्या पाणलोटात श्रावण सरींची संततधार सुरु आहे. पावसात फारसा जोर नसला तरी मध्यम स्वरुपाच्या पावसाने या दोन्ही धरणांमध्ये नवीन पाणी दाखल होत आहे.

गंगापूर मध्ये काल सकाळी संपलेल्या 24 तासात 138 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. तर दारणात 132 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गंगापूरचा साठा 84.51 टक्के तर दारणाचा साठा 83.02 टक्के इतका झाला आहे. नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात पावसाचे तसेच धरणातील ओव्हरफ्लोचे काही पाणी दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून गोदावरीत 1211 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे.

गंगापूर धरण
पारनेर तहसीलदारांच्या 'त्या' ऑडिओ क्लिपवरुन भाजपा आक्रमक

गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात गंगापूरच्या भिंतीजवळ 50 मिमी, अंबोलीला 39 मिमी, त्र्यंबक ला 19 मिमी, असा पाऊस नोंदला गेला. 5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये काल सकाळी 4758 उलघफू पाणीसाठा होता. गंगापूर समुहातील कश्यपीला 21 मिमी, गौतमी ला 19 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपी 58.32 टक्के तर गौतमी 69.43 टक्क्यांवर पोहचले आहे. गंगापूर मधून या पुर्वी 440 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तो अर्धा टिएमसी हुन काहिसा कमी आहे. आता गंगापूर 84.51 टक्क्यांवर पोहचले आहे. या धरणातुन पाण्याची आवक सुरु राहिली तर विसर्ग सुरु होवू शकतो.

दारणा 83.02 टक्के भरले आहे. 7149 दलघफू (7.1टिएमसी) क्षमतेच्या या धरणात 5935 दलघफू म्हणजेच जवळपास 6 टिएमसी पाणीसाठा आहे. या धरणातुन 150 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे. हा विसर्ग गेटच्या लिकेज मधून सुरु आहे. दारणात भावलीतून 135 क्युसेक ने विसर्ग दाखल होत आहे. दारणाच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या 24 तासात भिंतीजवळ 26 मिमी, इगपूरीला 43 मिमी, भावलीला 53 मिमी पावसाची नोंद झाली. दारणात 132 क्युसेक पाण्याची आवक 24 तासात झाली. दारणात 1 जून पासून 8.3 टिएमसी पाणी नव्याने दाखल झाले. त्यातील 5.9 टिएमसी पाणी धरणात आहे. अन्य पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दारणातून 3.3 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

खाली नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात दारणातील 150 क्युसेक, वालदेवीतील 65 क्युसेक, पालखेड मधील 391 क्युसेक पाणी दाखल होत आहे. आणि या बंधार्‍याच्या पाणलोटातील ओढ्या नाल्यातून येणारे पाणी असा 1211 क्युसेक ने विसर्ग गोदावरीत सोडण्यात येत आहे. काल सकाळी 6 पर्यंत या बंधार्‍यात गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने एकूण 4.7 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

गंगापूर धरण
ध्येयवेड्या प्रणाली चिकटेचा १० हजार किमीचा थक्क करणारा प्रवास...

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पाऊस (पाऊस मिमीमध्ये)

ब्राम्हणगाव 35, देवगाव 45, कोपरगाव 35, पढेगाव 26, सोमठाणा 40, कोळगाव 45, सोनेवाडी 27, राहाता 30, रांजणगाव 36, शिर्डी 30, चितळी 35 मिमी असा पाऊस नोंदला गेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com