
अहमदनगर |ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar
येणार्या काळात ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला केंद्र सरकारच्या ( Central Government) धोणानुसार 55 लिटर प्रमाणे शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा (Pure and sustainable water supply) करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आयुष्य संपलेल्या आणि सध्या 40 लिटरप्रमाणे पाणी पुरवठा (Water supply) करणार्या प्रादेशिक आणि नळ पाणी पुरवठा (Regional and tap water supply) योजनांपैकी 700 योजना पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारच्या (Central Government) जलजीवन (Water life) योजनेत पुनर्जीवित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (Rural Water Supply Department of Zilla Parishad) याच कामात व्यस्त असून पुनर्जीवित करण्यात येणार्या योजनांमध्ये जिल्हा परिषदेकडील (Zilla Parishad) 616 आणि उर्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील प्रादेशिक (Maharashtra Jeevan Pradhikaran) पाणी योजनांचा (Water schemes) समावेश आहे. पुनर्जीवित (Revived) करण्यात येणार्या योजना या दोन प्रकारातील असून यात संपूर्ण आयुष्य संपलेल्या पाणी योजना आणि सध्या 40 लिटर प्रती कुटूंब आणि प्रत्येकी व्यक्ती यांचे रुपांतर 55 लिटर कुटूंब आणि प्रत्येकी व्यक्ती पाणी उपलब्ध करून देणार येणार आहे.
जिल्ह्यात 1994 ते 95 दरम्यान मंजुरी दिलेल्या आणि तयार करण्यात आलेल्या पाणी योजना (Water scheme) या प्रती व्यक्ती आणि प्रती कुटूंब 55 लीटर पाणी (water) द्यावयाचे हे गृहीत धरून तयार करण्यात आलेल्या आहेत. मात्र, नंतरच्या काळात दुष्काळ (Drought) पावसाचे प्रमाण कमी या कारणामुळे प्रती व्यक्ती आणि प्रती कुटूंब 40 लिटर पाणी यानूसार पाणी योजनांना (Water schemes) मंजुरी देण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने (Central Government) धोरणात्मक निर्णय घेत प्रत्येक व्यक्तीला दिवसाला 55 लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जलजीवन योजनेत बंद पडलेल्या योजना 55 लिटर पाण्यानूसार सुरू करण्यात येणार असून 40 लिटर पाण्याच्या योजनांचे 55 लिटरनूसार विस्तारिकरण करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 700 योजनांचा या समावेश करण्यात आलेला असून त्यासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहेत.
अशा आहेत तालुकानिहाय योजना
अकोले 78, जामखेड 23, कर्जत 69, कोपरगाव 49, नगर 91, नेवासा 72, पारनेर 38, पाथर्डी 21, राहाता 51, राहुरी 64, संगमनेर 58, शेवगाव 23, श्रीगोंदा 45 आणि श्रीरामपूर 28.
दिवसंदिवस लोकसंख्या वाढत असून यामुळे पर्यायाने कुटूंब संख्याही वाढत आहे. त्यातच आता केंद्र सकारने प्रत्येक व्यक्तीला दिवसाला 55 लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला असून यापाण्याचा साठा हा मर्यादित अथवा पावसावर अवलंबून आहे. यामुळे सरकार प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाण्यानूसार पाणी कोठून उपलब्ध करणार असा प्रश्न आहे.