भाजपात गेलेले मनीलाँडर

जलसंपदा मंत्र्यांचा खळबळजनक आरोप
भाजपात गेलेले मनीलाँडर

अहमदनगर | प्रतिनिधी

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपात गेलेल्या अनेकांनी मनी लाँड्रिंग केलेले आहे. मात्र अशांना इन्कमटॅक्स, ईडी, सीबीआयचे सरंक्षण असल्याचा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

मंत्री पाटील दोन दिवशीय जिल्हा दौर्‍यावर आहेत. बुधवारी त्यांनी नगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. किरण लहामटे, आ. संग्राम जगताप, माजी आ. नरेंद्र घुले आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, एकनाथ खडसे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख आदींवर होत असलेल्या चौकश्या राजकीय आहेत. आम्ही चौकशांना घाबरत नाही. आमच्याकडेही भाजपात गेलेले आणि ज्यांची ईडी चौकशी व्हावी, अशांची यादी आहे. आम्ही यादी देणार असल्याचे मंत्री पाटील यावेळी म्हणाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्याला वेळ देत नाहीत, या मुद्यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, मी त्यांच्यासोबत बोलतो. ते जिल्ह्यात येत नसले तरी येथील कामे थांबलेली नाही. त्यांच्याविषयी अद्याप कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या नाहीत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रीत लढावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. कोणाला स्वतंत्र लढायची इच्छा असेल तर त्यावर विचार करू. निवडणुकांना वेळ आहे. स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करून कसे लढायचे याचा निर्णय त्यावेळी घेऊ, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. महापालिकेच्या एका प्रभागात चार नगरसेवक असावे अशी भूमिका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची होती. त्यांच्यातील काहींनी प्रभागात दोन नगरसेवक असावे अशी भूमिका घेतली, आमची पण तीच भूमिका होती. परंतु यावर सर्वांनुमते निर्णय झाला आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

ओढून-ताणून ईडी, सीबीआयचा वापर करून गुन्हे दाखल करत महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील अनेकांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. ज्यांनी खरे आर्थिक घोटाळे केले त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते भाजपच्या आशीर्वादाने शाबूत असल्याचा आरोप मंत्री पाटील यांनी केला आहे.

कामे थांबलेली नाहीत

पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) जिल्ह्याला वेळ देत नाहीत, या मुद्यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, मी त्यांच्या सोबत बोलतो. ते जिल्ह्यात येत नसले तरी येथील कामे थांबलेली नाही. त्यांच्याविषयी अद्याप कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या नाही.

आघाडी व्हावी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Election) महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) एकत्रीत लढावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची भूमिका आहे. कोणाला स्वतंत्र लढायची इच्छा असेल तर त्यावर विचार करू. निवडणूकांना वेळ आहे. स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करून कसे लढायचे याचा निर्णय त्यावेळी घेवू, असे मंत्री पाटील यांनी सांगीतले.

बदनामीचे षडयंत्र

ओढून-ताणून ईडी, सीबीआयचा वापर करून गुन्हे दाखल करत महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील अनेकांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. ज्यांनी खरे आर्थिक घोटाळे केले त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते भाजपच्या आशीर्वादाने शाबूत असल्याचा आरोप मंत्री पाटील यांनी केला आहे.

‘ती’ चव्हाणांची इच्छा

महापालिकेच्या एका प्रभागात चार नगरसेवक असावे अशी भूमिका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांची होती. त्यांच्यातील काहींनी प्रभागात दोन नगरसेवक असावे अशी भूमिका घेतली, आमची पण तीच भूमिका होती. परंतु यावर सर्वांनुमते निर्णय झाला आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

Related Stories

No stories found.