भूजल उपसा थांबविण्यासाठी ग्रामस्तरावर पाण्याचे नियोजन हवे - पद्मश्री पवार

कृषी अनुसंधान केंद्र नवी दिल्लीची ऑनलाईन कार्यशाळा
भूजल उपसा थांबविण्यासाठी ग्रामस्तरावर पाण्याचे नियोजन हवे - पद्मश्री पवार

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - सध्या जगभरात शंभरच्या वर देशात व भारतात 15 राज्यात पाणीटंचाईची तीव्र समस्या आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारा भूजलाचा उपसा थांबविण्यासाठी प्रत्येक गावाने ग्रामस्तरावर पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. हिवरे बाजारामध्ये उपलब्ध पावसाच्या पाण्यावर पाण्याचा ताळे बंदानुसार आधारित पिक पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार देशातील इतर गावात सुध्दा पाण्याच्या ताळेबंदावर आधारित पिक पद्धतीची अंमलबजावणी होणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार केले.

कृषी अनुसंधान केंद्र नवी दिल्ली स्थापना दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत पद्मश्री पवार यांनी बोलत होते.2020-21 मध्ये पद्मश्री प्राप्त शेतकर्‍यांचा अनुभव भारतातील महासंचालक, उपमहासंचालक कृषी अनुसंधान केद्न, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यांचेशी संवाद घडवून आणला. त्यात काही निवडक पद्मश्रीना बोलण्याची संधी मिळाली त्यात पद्मश्री पवार यांनी आपले मत व्यक्त केले. पवार म्हणाले, आपले आजोबा झर्‍याचे पाणी पित होते, वडील विहिरीचे पाणी पित होते आणि नातवाला 200 फुट खोलीवरच्या बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. फक्त 40 वर्षांच्या कालखंडात एवढ्या मोठ्या बदलाला सामोरे जावे लागत असेल त्यावरून भविष्यकाळातील पाणीटंचाईच्या तीव्रतेची आपणास कल्पना येईलच.

अन्यथा पंजाबचीजी परिस्थिती आज आपण पाहतो ती इतरत्र व्हायला वेळ लागणार नाही. रासायनिक खते व औषधे यांच्या अतिरेकी वापरावर हि लक्ष देण्याची गरज आहे. हिवरे बाजारमध्ये वन क्षेत्र, गायरान व खाजगी क्षेत्रावर वनीकरणाचे मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळे उत्पादनात वाढ झाली. याप्रसंगी पद्मश्री पवार यांनी कृषी विज्ञान केद्न बारामती, कृषी विज्ञान केंद्न दहीगावने, कृषी विज्ञान केद्न बाभळेश्‍वर, कृषी विज्ञान केंद्न नंदुरबार या कृषी विज्ञान केंद्रांच्या कृषी क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कामाचा उल्लेख केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com