जलवाहिनी फुटल्यानेे शेतकर्‍यांचे नुकसान
सार्वमत

जलवाहिनी फुटल्यानेे शेतकर्‍यांचे नुकसान

पॉलीहाऊससह मका, घास, ऊस पिकाचे प्रंचड नुकसान

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) | Ahmednagar -

नगर शहराला पाणी पुरवठा करणारी महापालिकेची मुख्य जलवाहिनी सोमवारी सकाळी विळद शिवारात फुटल्याने लाखो लिटर पाणी परिसरातील शेतीमध्ये घुसले. त्यामुळे पॉलीहाऊससह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याचा जोरदार प्रवाह सुमारे 45 मिनिटे सुरु असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

महानगरपालिकेची जलवाहिनी फुटून पाण्याचा जोरदार प्रवाह शेतात घुसल्याने पॉलीहाऊससह मका, घास, ऊस पिकाचे प्रंचड नुकसान झाले आहे. महापालिकेने तातडीने नूकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी दत्तात्रय जगताप, ज्योती पवार, सचिन जगताप यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com