‘जल जीवन’ अंतर्गत ग्रामीण भागात घराघरात नळ जोडणी

‘जल जीवन’ अंतर्गत ग्रामीण भागात घराघरात नळ जोडणी

राजेंद्र क्षीरसागर : 22 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान गाव कृती आराखडा अभियान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या (District) ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा (Water supply through tap connection) करण्यात येणार आहे. यासाठी जल जीवन मिशन (Water Life Mission) अंतर्गत 22 जुलै ते 7 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (Zilla Parishad CEO Rajendra Kshirsagar) यांनी दिली.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे (Rural Water Supply Department) कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर (Data entry operator) तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम पद्वारे गाव कृती आराखडा बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम प द्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तालुका पातळीवर गाव कृती आराखडाबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देणार आहेत. 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून कृती आराखडाची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करुन येत्या 15 ऑगस्ट रोजी होणार्‍या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) परिक्षीत यादव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com