पाणी फाऊंडेशनच्या बक्षिसातून वडनेर हवेलीत पुन्हा जलसंधारण

पाणीदार ग्रामस्थांचा ओढे खोलीकरणासाठी पुढाकार
पाणी फाऊंडेशनच्या बक्षिसातून वडनेर हवेलीत पुन्हा जलसंधारण

पारनेर |प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील वडनेर हवेली येथे पुन्हा एकदा जलसंधारण कामाला सुरुवात झाली गावातील ओढे रुंदीकरण व खोलीकरण याचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती सरपंच लहू भालेकर यांनी दिली.

वडनेर हवेली येथे पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळालेल्या 10 लाख रुपये बक्षिसाची रक्कम गावातील जलसंधारण कामासाठी खर्च करण्यात येणार असून त्यानुसार जलसंधारण कामांना सुरूवात करण्यात आली आहे. 2019 ला झालेल्या पाणी फाउंडेशन च्या स्पर्धेत वडनेर हवेली या गावाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला होता. सन्मानचिन्ह व 10 लाख रुपये असे बक्षिसाचे स्वरूप होते. या दहा लाख रुपयांचा निधी गावातील जलसंधारण कामासाठी खर्च करण्यासाठी नुकताच ग्राम स्तरावरून ठराव झाला.

त्यानुसार गावातील ओढे रुंदीकरण व खोलीकरण मोहीम हाती घेण्यात आली गावातून वाहत असणारे दोन्ही ओढे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. पाणी फाउंडेशन मधून मिळालेल्या बक्षिसाची रक्कम तसेच लोकसहभाग यामध्ये घेण्यात येणार आहे 2019 ला झालेल्या पाणी फाउंडेशन च्या स्पर्धेत वडनेर हवेली हे राज्यात सातव्या क्रमांकावर पोचले होते तसेच तालुक्यात प्रथम क्रमांक आला गावामध्ये त्यावेळेस विविध ठिकाणी जलसंधारणाचे काम करण्यात आले ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदाना सह लोकसहभागातून लाखो रुपयांचा निधी जमा केला व त्यातून वडनेर हवेली पाणीदार झाले गावची दुष्काळी असणारी ओळख पुसून पाण्याचं काम वडनेर हवेली या गावाने उभे केले होते.

मात्र त्यानंतर कोरोना मुळे सर्व ठप्प झाले होते. कोरोना काळात गावातील जलसंधारणाचे काम बंद पडले होते मात्र कोरोना परिस्थिती निवाळल्यानंतर वडनेर हवेली ग्रामस्थ व ग्रामपंचायतने पुन्हा जलसंधारण चळवळ हाती घेतली असून गावातील ओढ्या चे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे गावातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

यावेळी उपसरपंच नंदू भालेकर, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र बोथरा, ग्रामपंचायत सदस्य संतोष केदारे, तात्याभाऊ भालेकर, बबन कुटे, अमोल लटांबळे, स्वप्निल भालेकर, बबलू बढे, साहेबराव भालेकर, सुनील बढे, बबन दरेकर, सचिन बढे, विनायक कर्डिले, मोहन भालेकर, नवनाथ बढे, वसंत बढे, सुदाम पिंपरकर, गणेश भालेकर, रामा साळुंखे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.