पाणी फाउंडेशनतर्फे पुणेवाडीचा सन्मान

समृद्धगाव स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
पाणी फाउंडेशनतर्फे पुणेवाडीचा सन्मान

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत तालुक्यातील पुणेवाडी गावाला पश्चिम महाराष्ट्र मास्टर तांत्रिक प्रशिक्षक संदेश कारंडे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

मागील वर्षांमध्ये गावाने मनसंधारण नंतर जलसंधारण करून पाणी व्यवस्थापनाची कामे उत्कृष्ट पद्धतीने केली.वृक्ष लागवड, पर्जन्यमापक, पाणलोटाचे विविध उपचार लोकसहभागातून करण्यात आले. मिनी स्पर्धा टप्पा एक मध्ये विहीर, बोरवेल, गावातील पीक पद्धती यांचा सर्वे करण्यात आला. वॉटर कपमध्ये गावांनी सहभाग घेऊन पाणी निर्माण केल्यानंतर आता समृद्ध गाव स्पर्धेमध्ये शेती आणि उद्योग व्यवसाय यांच्या माध्यमातून उपजीविकेवर भर देण्यासाठी गाव काम करत आहे.

यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब रेपाळे, वकील बाळासाहेब सोनवणे, माजी सरपंच सुहास पुजारी, बापूसाहेब पुजारी, प्रगतिशील शेतकरी बन्सी रेपाळे व दगडूभाऊ बोरुडे, सिताराम रेपाळे,नामदेव रेपाळे, प्रा.राजेंद्र दुष्मान, मोहन रेपाळे व ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहिती अभिजीत गोडसे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com