राहुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनात दोघांचा मृत्यू

राहुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनात दोघांचा मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालूक्यात (Rahuri Taluka) एका तरूणासह एक वयोवृद्ध इसम पाण्यात बुडून (Water Drowning) मरण (Death) पावल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. तालूक्यात दोन ठिकाणी घडलेल्या या घटनां बाबत राहुरी पोलीसांत (Rahuri Police) आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

राहुल सुभाष पवार (वय २६ वर्षे रा. खंडाळा ता. वैजापूर जि. औरंगाबाद) हा तरूण सध्या राहुरी (Rahuri) येथे राहत होता. दिनांक २ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान राहुरी (Rahuri) येथील चिंचाळे गडधे आखाडा शिवारातील दगड खाणीत राहुल पवार हा अविवाहित तरूण खाणीत असलेल्या पाण्यात बुडून (Drowned) मयत झाला. अथक परिश्रम घेऊन त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. राहुल पवार याने आत्महत्या केली किंवा त्याचा काही घातपात झाला. हे मात्र समजू शकले नाही. या घटने बाबत चंद्रकांत मोहन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तसेच दुसरी घटना ही राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) कोळेवाडी (Kolewadi) येथे घडली आहे. कोळेवाडी शिवारातील मुकूंदा आंबेकर यांच्या शेत तळ्यात आनंद यशवंत आंबेकर या ७५ वर्षीय वयोवृद्ध इसमाचा मृत्यू (Death) शेत तळ्यातील पाण्यात बुडून (Death) झालाय. या घटने बाबत मुकुंदा आंबेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दोन्ही घटनेतील मयतांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या दोन्ही घटने बाबत राहुरी पोलीसांत आकस्मात गुन्हयाची नोंद करण्यात आली. या घटनांचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साईनाथ टेमकर हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com