देहरे येथे शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू
सार्वमत

देहरे येथे शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

आज सायंकाळची घटना

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) | Ahmedngar - नगर तालुक्यातील देहरे येथील आदेश रघुनाथ जगधने (वय 10) या शाळकरी मुलाचा देव नदीपात्रात पडून मृत्यू झाला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

सायंकाळी पाचच्या सुमारास आदेश हा त्याच्या लहान बहिणीबरोबर गुरे चरण्यासाठी देव नदी परिसरात गेला होता. त्यावेळी तो नदीत पडला.

एका महिलेने ही घटना पहिल्यानंतर तिने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. ग्रामस्थ येईपर्यंत आदेशचा मृत्यू झाला होता.

Deshdoot
www.deshdoot.com