Video : नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग सुरु; नदीकाठी सावधानतेचा इशारा

विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता
Video : नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग सुरु; नदीकाठी सावधानतेचा इशारा

अस्तगांव | वार्ताहर

नाशिक (Nashik) जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीत (Godavari River) पाणी जास्त प्रमाणात असल्याने आज सकाळी १०.०० वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वर (Nandur Madhyameswar) बंधाऱ्यातून मधून गोदावरी नदीपात्रात ६,३१० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

नाशिकमध्ये पाऊस सुरू असल्याने नदीच्या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात मान्सून कालावधीत प्रथमच पाणी सोडण्यात आल्याने कोपरगाव, राहता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदी लगतच्या गावातील लोकांनी पुढील काळात सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळी ६ वाजता ४०० क्युसेकने नंतर ९ वाजता ३१५५ क्युसेकने तर १० वाजता ६३१० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. हे पाणी नाशिक परिसरातील पावसाचे आहे. दारणा ७५ टक्क्या पर्यंत पोहचल्याने दारणातून आज संध्याकाळी विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे.

दारणा धरणातून विसर्ग सुरु

दारणा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून जलाशयातील पाणीसाठा आज सकाळी ७५% झाल्याने दारणा जलाशयातून विद्युत गृहाद्वारे आज सकाळी १० वाजता ५५० क्यूसेक्स विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पाऊस सुरुच राहील्यास व पाणीसाठ्यात आणखी वाढ झाल्यास दारणा जलाशयाचे radial gates मधून आणखी विसर्ग करण्यात येईल.

दरम्यान गोदावरीतील विसर्ग ११ वाजता ६३१० क्युसेक वरून १६१४ क्युसेक वर आणण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com