गोदावरीत ६३१० क्युसेकने विसर्ग
File Photo

गोदावरीत ६३१० क्युसेकने विसर्ग

राहाता (तालुका प्रतिनिधी)

नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत ६३१० क्युसेक ने विसर्ग सुरु आहे. जायकवाडीत काल सायंकाळी ६ वाजता ३४०८७ क्युसेक ने नविन पाण्याची आवक सुरु होती. तर या जलाशयातुन खाली गोदावरीत २८२९६ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. धरणांच्या परिसरात कमी आधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरु आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी धरणे पुर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पडणाऱ्या पावसाने नविन दाखल होणारे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल सायंकाळी ६ च्या आकडेवारी नुसार दारणातुन ११०० क्युसेकने, गंगापूर मधुन ११४२ क्युसेक, कश्यपीतुन १५० क्युसेक ने, आळंदीतुन ८० क्युसेक ने विसर्ग सुरु होता.

तसेच नांदूरमधमेश्वर बंधाऱ्या च्या मुक्तपाणलोट क्षेत्रातुन निफाड, नाशिक, व बंधाऱ्याच्या आजुबाजुच्या गावातुन ओढे नाले, छोट्या छोट्या नद्यांचे पाणी य बंधाऱ्यात दाखल होत असल्याने या बंधाऱ्यातुन ६३१० क्युसेक ने विसर्ग सुरु होता. हा विसर्ग काल सायंकाळी ६ वाजता ५५७६ क्युसेक वर आणण्यात आला होता. काल सकाळी सहा पर्यंत या बंधाऱ्यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत १ जुन पासुन २२.३ टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

जायकवाडीत काल सायेंकाळी ६ च्या आकडेवारीनुसार ३४०८७ क्युसेक ने नविन पाण्याची आवक होत होती. तर खाली गोदावरीत २८२९६ क्युसेक ने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. या धरणात ९८.९० टक्के पाणीसाठा होता.

काल ही बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील २३ पैकी १८ धरणं पुर्ण क्षमतेने भरली आहेत. मुकणे ७५.३६ टक्क्यांवर आहे. भोजापूर ५७.६२ टक्के, ओझरखेड ८०.८९ टक्के, पुणेगाव ९७.९१ टक्के, वाकी ९६.२३ टक्के इतके आहे. उर्वरित सर्व धरणे १०० टक्के भरली आहेत. कालच्या तारखेला नाशिक जिल्हयात मागील वर्षी ९४.५८ टक्के पाणी साठा होता. काल तो ९३.९३ टक्के इतका होता. काल सकाळी ६ वाजता संपलेल्या मागील २४ तासात गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पाऊस असा- कोपरगाव ५ मिमी, पढेगाव २० मिमी, सोमठाणा ११ मिमी, सोनेवाडी ६० मिमी, शिर्डी २८ मिमी, राहाता १२ मिमी, रांजणगाव ११ मिमी, चितळी २३ मिमी असा पाऊस नोंदला गेला.

Related Stories

No stories found.