जलयुक्ताच्या कामाबाबत समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची माहिती
जलयुक्ताच्या कामाबाबत समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार अभियान (Jalayukta Shivar Abhiyan) संदर्भात ज्या तक्रारी (Complaints) आलेल्या आहेत, त्याची खुली चौकशी (Open inquiry) करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) यांनी दिली.

अहमदनगर महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी शुक्रवारी मंत्री गडाख यांच्या उपस्थितीत महापौर (Mayor Charge) पदाचा पदभार घेतला. यानंतर मंत्री गडाख (Minister Gadakh) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील सरकारच्या काळात जलयुक्त शिवार अभियानातून (Jalayukta Shivar Abhiyan) कामे करण्यात आलेली होती. त्या कामाच्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कॅगने अहवाल (CAG reports) दिल्यानंतर या योजनेमध्ये जी कामे झाली, त्यातील 70 टक्के कामांमध्ये अनियमितता असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सुमारे दोन हजार कामांची चौकशी (Inquiry of works) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणाची खुली चौकशी करावी, अशी शिफारस समितीने सरकारकडे (Government) केली होती. काही ठिकाणी ही चौकशी झाली आहे. कामाचा दर्जा तसेच निकष या सर्व बाबींची पडताळणी करून ती समिती आपला अहवाल देणार आहे. 1100 ते 1200 कामांची चौकशी होणार आहे (works will be investigated). संबंधीत समितीने अंतिम अहवाल दिल्यानंतरच पुढील कारवाई निश्चतपणे केली जाईल, असेही मंत्री गडाख यांनी यावेळी सांगितले. राज्यामध्ये त्यावेळेला नऊ हजार कोटी रूपयांचा खर्च जलसंधारण विभागाच्या अभियानावर झाला होता. अनेक जिल्ह्यातून या कामांच्या तक्रारी (Complaints of work) आलेल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शून्य ते सहाशे हेक्टर सिंचन क्षमतेच्या अस्तित्वातील प्रकल्पांची दुरुस्ती करण्यास प्राधान्य दिले जाईल. त्या अनुषंगाने यंत्रणांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री शंकरराव गडाख यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात मंत्री गडाख यांनी जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा आणि कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. मृद व जलसंधारण विभागांतर्गत धोकादायक असणार्‍या जलस्त्रोतांची, बांधकाम उपचारांची विशेष दुरुस्ती करुन पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे, सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे आणि संरक्षित सिंचनाची सोय करणे तसेच विशेष दुरुस्ती नंतर पाणी वापर संस्था स्थापन करुन त्यांच्याकडे देखभाल आणि दुरुस्तीसाठी हस्तांतरित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रकल्पांची निवड करुन त्यांच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com