जलसंधारण महामंडळाच्या 20 कोटीच्या कामांना मंजुरी - आ. पवार

जलसंधारण महामंडळाच्या 20 कोटीच्या कामांना मंजुरी - आ. पवार
आ . रोहित पवार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत कर्जत - जामखेडसाठी सादर केलेल्या 20 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिली.

जलसंधारण महामंडळाची वरिष्ठ पातळीवरील उच्चस्तरीय बैठक अहमदनगर येथे पार पडली होती. या महामंडळाच्या बैठकीमध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील बंधार्‍यासंदर्भातील 26 कामे सुचवण्यात आली असून त्याचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. यामध्ये कर्जत तालुक्यातील 16 कामे तर जामखेड तालुक्यातील 10 कामांचा समावेश होता. बैठकीत झालेल्या चर्चेत दोन्ही तालुक्यातील मिळून जवळपास 20 कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते त्यास आता शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

मतदारसंघात यापूर्वी बंधार्‍याच्या दुरुस्तीची व देखभालीची विविध कामे करण्यात आली असून बंधार्‍यातून गळणारे पाणी थांबवण्यासाठी जलसंपदा, जलसंधारण व जि.पच्या माध्यमातून अशी एकूण 150 पेक्षा अधिक कामे मंजूर असून ती कामे देखील प्रगतीपथावर आहेत. ज्यामध्ये मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या माध्यमातून बंधार्‍यांची दुरुस्ती करणे व उंची वाढवणे, नव्याने कोल्हापुरी बंधारे बांधणे, जलसंधारण महामंडळाअंतर्गत बंधारे बांधणे, तुकाई उपसा सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी इत्यादी कामे मतदारसंघात मंजूर आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com