अवकाळी पावसाची शक्यता

हवामान खात्याचा अंदाज
अवकाळी पावसाची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) -

उत्तर कर्नाटकाचा अंतर्गत भाग व आग्नेय मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्रसह

मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

मध्य महाराष्ट्रात 19 मार्च रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 20 मार्च रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता, तर 21 मार्च रोजी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गहू, हरभरा उत्पादक धास्तावले

अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने नगर जिल्ह्यातील गहू, हरभरा उत्पादक धास्तावले आहेत. जो गहू काढणीला आला आहे. तो काढून घेण्याची घाई करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतात हरभरा काढून पडून आहे. तोही सुरक्षीतस्थळी नेण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com