वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत 22 कोटी रुपयांचे नुकसान

24 तासानंतरही आग आटोक्यात नाही
वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत 22 कोटी रुपयांचे नुकसान

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत 22 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने मोठे प्रयत्न करूनही चोवीस तासानंतर ही आग आटोक्यात आले नाही. या आगीत सर्वाधिक नुकसान कापसाचे झाले आहे.

बाजार समितीच्या आवारात असणार्‍या या गोदामाला मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती. आगीचे वृत्त समजताच या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ही आग मोठी असल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलत विविध ठिकाणच्या अग्निशामक दलाला पाचारण केले होते. संगमनेर नगरपालिका, थोरात साखर कारखाना, अकोले साखर कारखाना, विखे साखर कारखाना, सिन्नर अशा आठ ठिकाणच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.

अग्निशामक दलाच्या प्रयत्नामुळे ही आग पहाटे आटोक्यात आली. मात्र सकाळी गोदामातील कापसाने पुन्हा पेट घेतला. दिवसभर या गोदामात आगीच्या ज्वाला दिसत होत्या. रात्री गोदामांमध्ये हवा घुसल्याने गोदामातील कापसाने पुन्हा पेट घेतला आणि आगीने रुद्र रूप धारण केले. रात्री उशिरा माजी नगरसेवक सोमेश्वर दिवटे, नगरसेवक नितीन अभंग संगमनेर बाजार समितीचे सचिव सतिश गुंजाळ व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली.

गोदामामध्ये कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणात होत्या. या सर्व जळून खाक झाल्या. 17 कोटी 37 लाख रुपये या कापसाची किंमत असल्याचे सांगण्यात आले याशिवाय 2 कोटी 13 लाख रुपये किमतीचा चना, पाच लाख रुपयांचे सोयाबीनचे अडीच हजार पोती, दोन लाख रुपये किमतीचे गव्हाचे दोनशे दहा पोतेे, सात लाख रुपये किमतीचे बाजरीचे चौदाशे पोते असे सुमारे वीस कोटी रुपयांचे नुकसान झाल. गोदामाचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले.

बाजार समितीमध्ये अग्निशामक गाड्यांचे रीघ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या या गोदामाला मोठी आग लागल्याने वेगवेगळ्या तालुक्यातून अग्निशामक गाड्या बोलावण्यात आल्या. आसपासच्या तालुक्यातील साखर कारखाने नगरपालिका खाजगी उद्योग यांनी अग्निशामक पाठविल्या. सर्व अग्निशामक बाजार समितीच्या आवारामध्ये आग विझविण्यासाठी प्रयत्न करत होत्या बाजार समितीमध्ये या अग्निशामक यांची रीघ लागलेली दिसत होती. 24 तासात या अग्निशामक गाड्यांनी मोठ्या प्रमाणावर फेर्‍या केल्या तरीही हि काल दुसर्‍या दिवशी उशिरापर्यंत आटोक्यात आलेली नव्हती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com