प्रभागनिहाय लसीकरणाचा राहाता पॅटर्न राज्याला दिशा देणारा

प्रभागनिहाय लसीकरणाचा राहाता पॅटर्न राज्याला दिशा देणारा

शहरातील नागरिकांचा लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

राहाता |प्रतिनिधी| Rahuri

लसिकरणाचा राहाता पॅटर्न राज्याला दिशा देणारा ठरला आहे. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, कोलमडणारे नियोजन यावर प्रभागनिहाय लसिकरण निराधार, दिव्यांग तसेच वृद्धांसाठी दिलासा देणारा ठरत आहे.

आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, नगरपालिका, तालुका आरोग्य विभाग यांच्या संकल्पनेतून राहाता शहरात प्रभागनिहाय लसीकरणाला मागील आठवड्यात सुरूवात झाली. या लसीकरण मोहिमेत विखे समर्थक कार्यकर्त्यांनी भूमिका देखील महत्वपूर्ण ठरत आहे. कोणत्या प्रभागात केव्हा लसीकरण केले जाणार याची माहिती अगोदरच समाज माध्यमांवरून दिली जाते. त्या प्रभागातील नगरसेवक 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरणाच्या ठिकाणी येण्याचे आवाहन करतात.

नागरिकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत मार्गदर्शन करुन शंका दूर करतात. आतापर्यंत 45 वर्षापुढील जवळपास 303 नागरिकांचे पहिला डोस देवून लसीकरण केले गेले. वाड्या-वस्त्यावर लसीकरण मोहीम राबवल्यानंतर चितळी रोड येथील साई विठ्ठला लॉन्स येथे काल लसीकरण पार पडले. येथे 80 वर्षांच्या आजींनी देखील लस घेत या उपक्रमाचे कौतुक केले. अनेकदा लसीकरणासाठी जावून देखील त्या आजींना लस मिळाली नव्हती. प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेसाठी डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. मिलिंद गोडसे यांच्यासह एस. ए. तपासे, गौरी गोरे, शितल दिवे, मिना मोरे या आरोग्य कर्मचारी सेवा देत आहेत.

या लसीकरणाची सुरूवात गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, भाजपचे उपाध्यक्ष रघुनाथ बोठे, भाऊसाहेब जेजूरकर, राजेंद्र निकाळे, नगरसेविका सविता सदाफळ, नगरसेवक भिमराज निकाळे, बापूसाहेब वैद्य यांचे हस्ते करण्यात आली. लसीकरण योग्यरित्या पार पडावे यासाठी विरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, दशरथ तुपे, किरण वाबळे, गणेश सदाफळ, कुणाल वारूळे, संतोष सदाफळ यांनी विशेष परिश्रम घेतले. राजेंद्र वाबळे यांनी विनामुल्य जागा उपलब्ध करून दिली.

नियोजन व्यवस्थित आहे. कर्मचारी तसेच कार्यकर्ते देखील सहकार्य करत आहेत. लसीकरण केंद्रावर गर्दी असते, लस उपलब्ध नसेल तर माघारी परतावे लागते. प्रभागनिहाय लसीकरण सुरू झाल्याने वेळ व त्रासही वाचतोय.

- सविता कंदरकर, महिला

45 वर्षावरील ज्या नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात जाणे शक्य नाही खास करून जे दिव्यांग, निराधार व वयोवृद्ध आहे त्यांना प्राथमिकता दिली जाते. प्रभागनिहाय लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतोय. ज्यांना लसीकरणाबद्दल शंका आहे, भिती आहे त्याचे निरसनही डॉक्टरांकडून केले जाते.

- डॉ. गोकुळ घोगरे, वैद्यकीय अधिक्षक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com