प्रभाग रचनेनंतर आता आरक्षणाकडे नजरा

झेडपी, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
प्रभाग रचनेनंतर आता आरक्षणाकडे नजरा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. गुरूवारी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून यात जिल्ह्यात 13 तालुक्यात गटाच्या आणि गणांच्या भौगोलिक रचनेत बदल करण्यात आला आहे. लोकसंख्येच्या निकषानूसार हे बदल करण्यात आले असून अनेक सदस्यांच्या विद्यमान गटांचे अस्तित्व संपले आहे. काही ठिकाणी नव्याने गटांची आणि गणांची निर्मिती झाली असून यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असणार्‍यांच्या नजरा आता गट आणि गणांच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत 73 जिल्हा परिषद गट आणि त्याच्या दुप्पट पंचायत समिती गण होते. यंदा त्यात वाढ होवून 85 झेडपी गट आणि 170 गण तयार झाले आहेत. गट आणि गणांचा आकार छोटा झाला आहे. यामुळे सदस्यांची निवडणुकीच्या प्रचारातील धावपळ कमी होणार असली तरी उमेवारीचे गणित मात्र आरक्षणावर अवलंबून राहणार आहे. यंदा देखील चक्रीयक्रमानूसार आरक्षण निघणार की नवीन गटात नव्याने आरक्षण काढणार याबाबत निवडणूक विभागात वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

गत पंचवार्षिकचा विचार केल्यास इतर मागसवर्गीय महिला राखीवसाठी दहा गट होते. सर्वसाधारण महिलांसाठी 16 गट राखीव होते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 21 गट राखीव होते. अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जाती महिलांसाठी 2, इतर मागसवर्गीयासाठी 10, अनुसूचित जमाती महिलांसाठी 4, अनुसूचित जाती महिलांसाठी 3 आणि अनुसूचित जमातीसाठी 2 असे 73 गटांचे आरक्षण होते.

आता गट आणि गणांची प्रभाग रचना जाहीर झाली असून त्यावर 8 जूनपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 27 जूनला जिल्हाधिकारी अंतिम गट आणि गणांची प्रभाग रचना जाहीर करणार आहेत. त्यानंतर खर्‍याअर्थाने आरक्षणाचा विषय समोर येणार आहे. मात्र, इच्छुक आरक्षण कसे निघणार नव्या पध्दतीने की जुन्या चक्रीय पध्दतीने याच्या चर्चेत व्यस्त असल्याचे दिसत आहेत. गट आणि गणाच्या रचनेच्या दिव्यातून पारपडलेल्या इच्छुकांचे लक्ष आता आरक्षणाकडे राहणार आहे. गट आणि गण आरक्षीत झाल्यास अथवा महिलांसाठी राखीव झाल्यास इच्छुकांच्या मनसुभ्यावर पाणी फिरणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत गट आणि गण आरक्षीत होवू नयेत, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

मागील निवडणुकीतील आरक्षण आणि सदस्य असे होते- सोनाली रोहमारे (ओबीसी महिला, चांदेकासारे), दिपाली गिरमकर (सर्वसाधारण महिला, आढळगाव), अनुराधा नागवडे (सर्वसाधारण महिला, बेलवंडी), (स्व) सदाशिव पाचपुते (सर्वसाधारण, काष्टी), गुलाब तनपुरे (सर्वसाधारण मिरजगाव), सुनीला खेडकर (ओबीसी, महिला कोरेगाव), उमेश परहर (अनुसूचित जाती, कुळधरण), कांतीलाल घोडके (अनुसूचित जाती राशिन), वंदना लोखंडे (अनुसूचित जाती महिला, खर्डा), सोमीनाथ पाचरणे (अनुसूचित जाती, जवळा), (स्व) शिवाजी गाडे (ओबीसी, बारागाव नांदूर), शशिकला पाटील (सर्वसाधारण महिला, वांबोरी), सुप्रिया झावरे (सर्वसाधारण महिला, ढवळपुरी), उज्ज्वला ठुबे (सर्वसाधारण महिला, कान्हूर पठार), काशिनाथ दाते (ओबीसी, ढाकळीढोकेश्वर), राणी लंके (सर्वसाधारण महिला, सुपा), पुष्पा वराळ (सर्वसाधारण, निघोज), कोमल वाखारे (ओबीसी महिला, येळपणे), ताराबाई पंधरकर (सर्वसाधारण महिला, कोळगाव), सुवर्णा जगताप (सर्वसाधारण महिला, मांडवगण), प्रताप शेळके (ओबीसी, देहेरे), भाग्यश्री मोकाटे (ओबीसी महिला, जेऊर), संदेश कार्ले (ओबीसी, दरेवाडी), माधवराव लामखडे (सर्वसाधारण, निंबळक), अनिता हराळ (सर्वसाधारण महिला, वाळकी), जनाबाई पैसे (अनुसूचित जामाती महिला, टाकळीमियाँ), महेश सुर्यवंशी (अनुसूचित जमाती, ब्राम्हणी), नंदा गाढे (सर्वसाधारण महिला, सात्रळ), सुरेखा साळवे (अनुसूचित जाती महिला, सोनई), सविता आडसुरे (ओबीसी महिला, चांदा), राजश्री घुले (सर्वसाधारण महिला, दहिगावने), संगिता दुसुंगे (अनुसूचित जाती महिला, बोधेगाव), हर्षदा काकडे (सर्वसाधारण, लाडजळगाव), रामभाऊ साळवे (अनुसूचित जाती, भातकुडगाव), राहुल राजळे (सर्वसाधारण, कासार खरवंडी), प्रभावती ढाकणे (सर्वसाधारण, भालगाव), संध्या आठरे (ओबीसी महिला, माळी बाभुळगाव), (स्व) अनिल कराळे (ओबीसी, मिरी), ललिता शिरसाट (ओबीसी महिला, टाकळी मानूर), शालीनीताई विखे पाटील (ओबीसी महिला, लोणी खु), दिनेश बर्डे (अनुसूचित जमाती, कोल्हार बु), मंगल पवार (अनुसूचित जमाती महिला, उंदिरगाव), आशा दिघे (सर्वसाधारण, दत्तनगर), शरद नवले (सर्वसाधारण, बेलापूर खु), दादासाहेब शेळके (सर्वसाधारण, बेलपिंपळगाव), तेजश्री लंघे (ओबीसी माहिला, कुकाणा), दत्तात्रय काळे (ओबीसी, भेंडा बु), मिना शेंडे (अनुसूचित जाती महिला, भानसहिवरे), सुनील गडाख (ओबीसी, खरवंडी), रामहरी कातोरे (ओबीसी, धांदरफळ बु), मिलींद कानवडे (ओबीसी, संगमनेर खु), अजय फटांगरे (ओबीसी, बोटा), मीरा शेटे (सर्वसाधारण महिला, साकूर), सुधाकर दंडवते (सर्वसाधारण, सुरेगाव) विमल आगवण (सर्वसाधारण महिला, ब्राम्हणगाव), सोनाली साबळे (अनुसूचित जाती महिला, वारी), राजेश परजणे (सर्वसाधारण, शिंगणापूर), शाम माळी (अनुसूचित जमाती, पुणतांबा), कविता लहारे (ओबीसी महिला, वाकडी), पुष्पा रोहम (सर्वसाधारण महिला, साकुरी), जालींदर वाकचौरे (सर्वसाधारण देवठाण), कैलास वाकचौरे (सर्वसाधारण, धामगाव आवारी), सुनिता भांगरे (सर्वसाधारण महिला, राजुर), किरण लहामटे (सर्वसाधारण, सातेवाडी), रमेश देशमुख (सर्वसाधारण कोतुळ), भाऊसाहेब कुटे (सर्वसाधारण, समनापूर), महेंद्र घोडगे (सर्वसाधारण, वडगावपान), रोहणी निघुते (सर्वसाधारण महिला, आश्वी बु), शांता खैरे (अनुसूचित जमाती महिला, जोर्वे), सिताराम राऊत (सर्वसाधारण, घुलेवाडी).

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com