वक्फ बोर्डाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती

कर्जतच्या हजरत दावल मलिक देवस्थान शंभर एकर जमीनीचा वाद
वक्फ बोर्डाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत येथील श्री पीर हजरत दावल मलिक देवस्थानच्या एकशे दोन एकर या वर्ग 3 जमिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नवीन व्यवस्थापकीय मंडळाला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी दिलेल्या मान्यतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. अशी माहिती ट्रस्टच्या ट्रष्टीचे चे वंशज सोहराब युसुफ शेख यांनी आज पत्रकारांना दिली .

यासंदर्भात बोलताना सोहराब शेख पुढे म्हणाले की, पीर हजरत दावल मलिक ट्रस्ट ही सर्वधर्मीय पब्लिक ट्रस्ट आहे व याला 22 जानेवारी 1953 रोजी धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे नोंदणी करून मान्यता मिळालेली आहे. असे असताना या सर्वधर्मीय पब्लिक ट्रस्टच्या विरोधात वक्त बोर्ड औरंगाबाद यांनी 19 जानेवारी 2019 रोजी ही सर्व सर्वधर्मीय ट्रस्टची जमीन वक्फ मिळकत म्हणून नोंद केली व सात फेब्रुवारी 2022 रोजी व्यवस्थापक व व्यवस्थापन मंडळ यांची नेमणूक केली मात्र हे करताना सर्वधर्मीय पब्लिक ट्रस्ट यांचे वंशज व या गावातील सर्व ग्रामस्थ यांना विचारात घेतले नाही.

वक्फ बोर्डाच्या आदेशानुसार नवीन व्यवस्थापक व व्यवस्थापन मंडळाने सर्वधर्मीय पीर हजरत दावल मलिक ट्रस्टच्या मिळकतीचा बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर मिळकतीच्या जागेवर अनधिकृतपणे मज्जित उभारण्याचे काम चालू केले होते. यामुळे ट्रस्टच्या ट्रष्टीचे चे वंशज सोहराब युसुफ शेख यांनी या पकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मध्ये वक्फ बोर्डाच्या आदेशाला आव्हान देणारी रिट याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर 28 मार्च रोजी खंडपीठातील न्यायमूर्ती आर डी धनुका व न्यायमूर्ती एस जी मेहेर यांच्यासमोर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने वक्फ बोर्ड औरंगाबाद यांची 19-7-2019 ची नोंदणी व सात फेब्रुवारी दोन हजार बावीस चे नवीन व्यवस्थापक व व्यवस्थापन मंडळाच्या स्थापनेच्या आदेशात स्थगिती दिली तसेच नवीन व्यवस्थापक व व्यवस्थापक मंडळाच्या कोणत्याही सदस्यास येथील श्री पीर हजरत दावल मलिक देवस्थानच्या एकशे दोन एकर या वर्ग 3 जमिनीत हस्ते शेप करण्यास व ताबा घेण्यास स्थगिती व मनाईचे अंतरिम आदेश दिले आहेत असे सोहराब युसुफ शेख यांनी सांगीतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com