वांबोरीत दीड लाखांचा मावा जप्त; एलसीबीची कारवाई

File Photo
File Photo

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरामध्ये गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या मावा बनवणार्‍या अड्ड्यावर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करत मावा तयार होत असलेला ठिकाणी धडक कारवाई करून दोघांना गजाआड केले तर तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल व मावा बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.या कारवाईमुळे वांबोरीसह राहुरी तालुक्यातील मावा बनवणार्‍या व मावा विक्री करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील लोहार गल्ली येथे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून राहुल सुगंध व तात्याबा धनवडे या दोघांना ताब्यात घेऊन तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले आहेे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी अशोक ढोकणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी राहुल रमेश सुगंध (वय 42) रा. लोहर गल्ली वांबोरी तालुका राहुरी, तात्याबा लक्ष्मण धनवडे (वय 34) राहणार हनुमाननगर वांबोरी ता. राहुरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com