वांबोरीच्या घाटात प्रवाशांना लुटणारे कात्रडमध्ये पकडले

एलसीबीची कामगिरी
वांबोरीच्या घाटात प्रवाशांना लुटणारे कात्रडमध्ये पकडले

अहमदनगर|Ahmedagar

रस्त्यात अडवून प्रवाशांची लुटमार करणार्‍या तिघा सराईत दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहुरी तालुक्यातील कात्रड येथून जेरबंद केले. सुरेश रणजीत निकम (वय 30), सतीश अरुण बर्डे (वय 28), व सागर शिवाजी जाधव (वय 30 सर्व रा. कात्रड) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

या तिघांसह त्यांच्या साथीदारांनी 23 एप्रिल रोजी मांजरसुंबा येथे भिंगार येथील दोघांना मारहाण करत लुटले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील दोघा आरोपींना अटक केली होती. तिघेजण मात्र पसार होते. अखेर पोलिसांनी या तिघांचाही शोध घेऊन त्यांना जेरबंद केले. अटक केलेल्या आरोपींविरोधात एमआयडीसी, राहुरी व सोनई पोलीस ठाण्यात दरोड्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, संदीप पवार, दिनेश मोरे, दिपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, रवींद्र घुंगासे, संदीप दरंदले, जालिदर माने यांनी या दरोडेखोरांना जेरबंद केले. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com