वांबोरीत बालविवाह रोखला

वधू-वरांचे आई-वडील व वरासह मामावर गुन्हा दाखल
वांबोरीत बालविवाह रोखला
file photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणार्‍या मुलीच्या व मुलाच्या आई-वडिलांसह मुलावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांबोरी येथे दि. 20 मे रोजी 16 वर्षे 7 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. आपली मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असूनही तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर लावून दिला. याबाबत राहुरी पोलिसांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीररित्या विवाह लावून देणार्‍या लोकांना ताब्यात घेऊन कारवाई केली.

राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक आजिनाथ पालवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत मुलीचे वडील, मुलीची आई दोघे रा. वांबोरी ता. राहुरी, मुलगा- विवेक जयानंद लोंढे, मुलाची आई निता जयानंद लोंढे रा. घाटकोपर मुंबई, मुलाचे मामा मंगेश सुखदेव केदार रा. भाळवणी, ता. पारनेर जि. अहमदनगर या पाच जणांवर गु. रजि. नं. व कलम 419/2022 बालविवाह प्रतिबंधक अधिनियम सन 2007 चे कलम 9, 10, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com