वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे मंत्री तनपुरे यांचे आदेश

पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍यांशी साधला संवाद
वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे मंत्री तनपुरे यांचे आदेश

करंजी |वर्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला असला तरी मिरी शंकरवाडी दत्ताचेशिंगवे रेणुकावाडी कडगाव या भागातील पाझर तलाव कोरडे असल्यामुळे व नगर नेवासा तालुक्यातील काही तलाव पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याने मुळा धरणातून तात्काळ पाणी वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे आदेश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुळा पाटबंधारे विभागाला दिले आहेत.

मंत्री तनपुरे यांनी पाथर्डी व नगर तालुक्यातील जे तलाव पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्या तलाव परिसरातील शेतकर्‍यांशी सोमवारी संवाद साधला व त्यांच्या इतरही वीज रस्त्याच्याबाबतचे प्रश्न जाणून घेतले व त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ संपर्क साधून रस्ता दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. सोलाटवस्ती, तागडवस्ती या ठिकाणच्या रस्त्यावर नळ्या टाकून तो रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्याला दिल्या. तसेच ज्या ठिकाणी ओव्हरलोडमुळे वीजपुरवठा खंडित होतो त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसवून देण्याच्या सूचना वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे आदेश दिले असून मिरी लाईनवरील 19 तलावांसह नगर तालुक्यातील खोसपुरी, आव्हाडवाडी, नेवासा तालुक्यातील चांदा, महालक्ष्मीहिवरे येथील तलावासाठी हा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील व कार्यकारी उप अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली.

यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, माजी सभापती संभाजी पालवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, उद्धव दूसंग, सरपंच आदिनाथ सोलाट, रवींद्र मुळे, बापूसाहेब आव्हाड, अमित आव्हाड, अंबादास डमाळे, भीमराव सोनवणे, पोपटराव आव्हाड, जगन्ननाथ लोंढे, अशोक दहातोंडे, दत्तू कोरडे, चेअरमन संतोष गरुड, विष्णू सोलाट, नामदेव सोलाट, राजेंद्र तागड, बलभीम बनकर, महादेव कुटे, बलभीम बनकर, आत्मा कमिटीचेे तालुकाध्यक्ष सुभाष गवळी, भागिनाथ गवळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख, युवानेते जालिंदर वामन, अजय पाठक, सतीश क्षेत्रे, किरण शेलार, बापूसाहेब घोरपडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.