वाळकी खुनातील आरोपींना पोलिसांचे सहकार्य

तांबोळी कुटुंबाचा आरोप: एसपींना निवेदन
वाळकी खुनातील आरोपींना पोलिसांचे सहकार्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाळकी (ता. नगर) येथे झालेल्या खुनातील पसार आरोपींना तात्काळ अटक करावी, सदर तपासी अधिकार्‍यांकडून तपास काढून दुसर्‍या अधिकार्‍यांकडे तपास वर्ग करण्याची मागणी, तांबोळी कुटुंबियांनी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी गणी तांबोळी, मयताची पत्नी मिनाज तांबोळी आदी उपस्थित होते.

पसार आरोपी कुटुंबियांना धमकावत असून, पोलीस आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. वाळकी येथे 17 ऑक्टोबर रोजी किरकोळ वादातून जावेद गणी तांबोळी या युवकाचा खून करण्यात आला. याप्रकरणी मयताची पत्नी मिनाज जावेद तांबोळी यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये 11 आरोपी आहेत. आतापर्यंत केवळ तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. इतर आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी चौकशी अधिकारी सहकार्य करत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com