वाकडीत दोन बिबट्ये मृतावस्थेत आढळले

वाकडीत दोन बिबट्ये मृतावस्थेत आढळले

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील वाकडी (Wakadi) येथील पानसरे वस्ती नजीक दोन बिबट्ये मृतावस्थेत (Leopard Death) आढळले आहेत. या दोन्ही बिबट्यांची (Leopard) झुंज होवून ते दोघेही गतप्राण झाले असावेत. गतप्राण झालेले हे दोन्ही बिबटे साधारणत: एक वर्ष वयाचे होते. दोन्हीही मादी जातीचे होते.

पानसरे वस्ती नजीक गट नं 596 मध्ये राजेंद्र कुंडलिक चौधरी यांचे क्षेत्र आहे. 23 मे रोजी सकाळी गिताराम पानसरे हे शेतात चारा काढण्यासाठी गेले असता त्यांना चौधरी यांच्या या क्षेत्राच्या बांधाजवळ बिबट्या (Leopard) झोपलेला अवस्थेत दिसला. त्यांनी बाबासाहेब चौधरी यांना याबाबत कळविले. ते दोघे सावधरितीने तेथे पोहचले. बिबट्या (Leopard) हालचाल करत नसल्याचे या दोघांच्या लक्षात आले. त्या ठिकाणाहुन काही अंतरावर एक दुसरा बिबट्या (Leopard) देखील झोपलेल्या अवस्थेत दिसून आला.

एव्हाना ही माहिती तात्काळ पसरली. तात्काळ वनविभागाशी (Forest Department) संपर्क करुन माहिती देण्यात आली. वन विभागाचे (Forest Department) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बिबटे रक्तभंबाळ झाल्यानंतर आपले प्राण सोडले असावेत असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. वनरक्षक संजय साखरे, वनपाल श्री. गाढे यांच्या सूचनेवरून वन रखवालदार सुरासे यांनी शासकीय पूर्तता करुन स्थानिकांच्या मदतीने या दोन्ही बिबट्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी केला.

वाकडी परिसरात बिबट्यांचे (Leopard) वास्तव्य आहे. रात्रीच्या वेळी हे बिबटे शिकारीसाठी मानव वस्तीकडे येतात. दरम्यान या दोन्ही बिबट्यांमधील एका बिबट्यास डोक्याला जबर दुखापत झालेली होती तर दुसर्‍याच्या मानेला तसेच अंगावर दुखापत (Injured) झालेली होती. या दोघांची चांगलीच झुंज झाली असल्याचे यावरून दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यावेळी प्रभाकर पानसरे, सुभाष पानसरे, गिताराम पानसरे, सतिश पानसरे, गणेश आहेर, विजय चौधरी, वसंत पानसरे, नितीन पानसरे, प्रमोद शेळके, अविनाश येणगे आदी युवकांनी वनविभागास सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com