
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
रविवारी रात्री तालुक्यातील वाकडी येथे नारळाच्या झाडावर वीज पडली.वाकडी येथील भास्कर रामकृष्ण लहारे यांच्या राहत्या घरामागे नारळाच्या झाडावर रात्री 10:15 च्या सुमारास वीज पडली.
या झाडावरुन आगीची लोळ तुटताना दिसत होते. अचानक आवाज झाल्याने लहारे कुटूंबियही घराबाहेर व मागे डोकावले. त्यांच्या गोठ्यातील गाया व शेळ्या घाबरुन उभ्या राहिल्या. नारळाच्या झाडाचे नुकसान वगळता कोणतीही हानी झाली नाही. तसेच 2 वर्षापूर्वी वीज पडून 4 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले होते.