
करंजी |प्रतिनिधी| Karanji
पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील जगदंबा माता वाघेश्वरी मंदिरातील दानपेटी बुधवारी (दि.16) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. दानपेटी चोरीला गेल्याची माहिती समजल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत तात्काळ पाथर्डी पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कौशल्यनिरंजन वाघ यांच्यासह करंजी आऊट पोस्टचे पोलीस कर्मचारी तसेच ठसेतज्ञ, श्वानपथक देखील घटनास्थळी दाखल झाले. वाघेश्वरी मंदिरातील दानपेटी चोरून नेणार्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सरपंच अनिल गीते पाटील, युवानेते राजेंद्र दगडखैर, देवेंद्र गिते, जयराम पाटील गिते, बाबासाहेब गिते, डॉ गोरक्षनाथ गिते, ज्ञानदेव गिते, पुजारी मिठु गिते, आकाश गिते, भगवान घुले यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.