वाघाचा आघाडा सोसायटीवर दुर्गामाता 10 जागा जिंकून जनसेवा मंडळाचे वर्चस्व

वाघाचा आघाडा सोसायटीवर दुर्गामाता 10 जागा जिंकून जनसेवा मंडळाचे वर्चस्व

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अग्रगण्य असणारी वाघाचा आखाडा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचा झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दुर्गामाता जनसेवा मंडळाने 10 जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तर विरोधी पुरोगामी जनसेवा मंडळाला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले.

वाघाच्या आघाडा सोसायटीची संचालक मंडळाची काल दि. 2 मे रोजी निवडणूक झाली. ना. तनपुरे यांच्या दोन गटात ही लढत झाली असून या मध्ये दुर्गामाता जनसेवेचे सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून धनंजय साहेबराव सप्रे, प्रशांत विनायक कटारे, राजू परसराम सप्रे, लक्ष्मण शहाजी तनपुरे, वसंत आनंदा येवले, विठ्ठल सोपान धसाळ तर महिला प्रतिनिधी मतदार संघातून म्हणून विजया लिंबराज कटारे व शैलाबाई गोरक्षनाथ तनपुरे तसेच इतर मागास प्रवर्ग किशोर उत्तम दौंड, भटक्या विमुक्त जाती /जमाती बाळासाहेब मुरलीधर आघाव हे उमेद्वार विजयी तर रवींद्र वेणुनाथ वाघ, सिताराम बाबुराव धसाळ हे दुर्गामाता जनसेवा मंडळाचे उमेद्वार पराभूत झाले.

तसेच पुरोगामी जनसेवा मंडळाचे बाळासाहेब बाबुराव तनपुरे, बाळासाहेब गंगाधर तनपुरे हे विजयी झाले. तर सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातील नंदू दगडू वाघ, गोरक्षनाथ गंगाधर धसाळ, दिलीप दत्तात्रय पटारे,तुकाराम भिमराज तनपुरे, बाबासाहेब नारायण कटारे, गजानन भाऊसाहेब सप्रे तसेच महिला प्रतिनिधी मतदार संघातील कमल केशव वरखडे, केशरबाई माणिक सप्रे, इतर मागास प्रवर्ग भगत प्रदीप रत्नाकर, भटक्या विमुक्त जाती /जमाती तुकाराम काशिनाथ आघाव, हे उमेदवार पराभूत झाले. आहे. या निवडणुकीत एकुण 256 पैकी 237 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यातून 12 मते बाद झाली. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती जे. जी.हराळ सहाय्यक पी.आर.चव्हाण हे काम पाहिले. निवडणूकीचा निकाल लागताच कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

दुर्गामाता जनसेवा मंडळा च्या विजयासाठी शेषराव सप्रे, सतीश वाघ, परसराम सप्रे,मच्छिंद्र धसाळ, बन्सी कटारे, सीताराम तनपुरे, भास्कर धसाळ, कैलास तनपुरे, नामदेव धसाळ, शरद तनपुरे, अजित तनपुरे, नरेंद्र धसाळ, भास्कर सप्रे, प्रशांत सप्रे,सतीश सप्रे, दत्तात्रय तनपुरे, जनार्दन कटारे, शिवाजी येवले, दत्तात्रय वाघ, नवनाथ वाघ, मनोहर तनपुरे, विठ्ठल तनपुरे, वेणूनाथ बेलकर, कृष्णा तनपुरे, विठ्ठल आघाव, रामदास कटारे, उत्तम वाघ, बाळासाहेब वाघ, उत्तम दौंड, नाना पेरणे, बाळासाहेब वाघ, देवराव सप्रे, भास्कर सप्रे, महेंद्र तनपुरे, संदिप सांंगळे यांनी परिश्रम घेतले.

या निवडणूकीत अनुसुचीत जाती- जमाती मतदार संघातून श्रीरंग गंगाराम माळी यांचा एकमेव अर्ज आला होता. मात्र निवडणूक निर्णय आधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरविल्याने ही जागा रिक्त राहीली.

Related Stories

No stories found.