
आरडगाव |वार्ताहर| Aradgav
राहुरी तालुक्याच्या राजकारणात अग्रेसर असणार्या नव्याने स्थापित झालेल्या वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 7 जागांसाठी एकूण 15 उमेदवार निवडून रिंगणात उभे आहेत. जनविकास मंडळ व दुर्गामाता जनसेवा मंडळ यांच्यात दुरंगी लढत होत असून अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी दर्शविली आहे. या दोन्ही गटात कोण बाजी मारणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तांदुळवाडी या ग्रुप ग्रामपंचायतमधून वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत 1 मार्च 2020 रोजी अस्तित्वात आली. त्यामुळे दि. 4 ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जनविकास मंडळचे प्रभाग क्र.1 अनुसूचित जाती गटातून गुलाब माळी, सर्वसाधारण स्त्री सारिका धसाळ, प्रतिभा पटारे, प्रभाग क्र.2 सर्वसाधारण पुरुष आदिनाथ तनपुरे, सर्वसाधारण स्त्री रंजना वाघ, प्रभाग क्र.3 सर्वसाधारण पुरुष संतोष सप्रे, सर्वसाधारण स्त्री रोहिणी सप्रे हे उमेदवार तर दुर्गामाता जनसेवा मंडळाचे प्रभाग क्र.1 अनुसूचित जाती गोरक्षनाथ बर्डे, सर्वसाधारण स्त्री लिलाबाई तनपुरे, निर्मला कटारे, प्रभाग क्र.2 सर्वसाधारण पुरुष उत्तम वाघ, सर्वसाधारण स्त्री हिराबाई वाघ, प्रभाग क्र.3 सर्वसाधारण पुरुष प्रशांत सप्रे, सर्वसाधारण स्त्री रोहिणी सप्रे, हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. तर सुनीता वाघ या प्रभाग क्र.2 मधून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
दुर्गामाता जनसेवा मंडळाचे नेतृत्व शंकरराव सप्रे, भास्कर सप्रे, कैलास तनपुरे, लक्ष्मण तनपुरे, प्रशांत कटारे, नामदेव धसाळ, किशोर दौंड, नरेंद्र धसाळ, धनंजय सप्रे, अनिल वाघ, आदी करीत आहेत. जनविकास मंडळाचे आदिनाथ तनपुरे, शरद धसाळ, सुभाष वाघ, विलास धसाळ, बाबासाहेब कटारे, बाळासाहेब तनपुरे, भास्कर धसाळ, गणेश वाघ, बाळासाहेब कटारे, नवनाथ वाघ, आदी करत आहेत. त्यामुळे दोन्ही गटांत कोण बाजी मारणार? की अपक्ष उमेदवार मुसंडी मारणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.