वडगाव गुप्ता हनीट्रॅप प्रकरण : तरूणीसह पंटर गिर्‍हेला पाच दिवस पोलीस कोठडी

आणखी एक जण ताब्यात
वडगाव गुप्ता हनीट्रॅप प्रकरण : तरूणीसह पंटर गिर्‍हेला पाच दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाथर्डी तालुक्यातील (Pathardi taluka) बागायतदाराला हनीट्रॅपच्या (Honeytrap) जाळ्यात अडकविणार्‍या वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील तरूणीसह (Girl) तिचा पंटर गणेश छगन गिर्‍हे (रा. राघेहिवरे ता. पाथर्डी) यांना एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) लोणी (Loni) येथे अटक (Arrested) केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर (Court) केले असता न्यायालयाने त्यांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Police cell) सुनावली आहे. दरम्यान, हनीट्रॅप प्रकरणी (Honeytrap case) आणखी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी (Investigation) सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक युवराज आठरे (Assistant Inspector Yuvraj Athare) यांनी दिली.

वडगाव गुप्ता (Wadgaon Gupta) परिसरात राहणार्‍या तरूणीने पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील बागायतदाराशी मैत्री केली. त्या बागायतदाराला वडगाव गुप्ता येथील घरी बोलून घेतले. तेथे त्याच्यासोबत फोटो (Photo) काढले. या फोटोच्या आधारे तरूणीने त्या बागायतदाराला ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचे ठरविले. 15 जून रोजी सायंकाळी ते दोघे एकत्र असताना त्याठिकाणी तरूणीचा कथित पती तेथे आला. त्याने त्यांना एकत्र पाहिले असे भासवून बागायतदाराला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली.

खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदाराकडील पाच हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. दुसर्‍या दिवशी पाथर्डी तालुक्यातील पंटर गिर्‍हे याला मध्यस्थी घालून दोन लाख रूपयांचे तीन चेक घेतले. आपली फसवणूक झाली असल्याचे त्या बागायतदाराच्या लक्षात येताच त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने नगरमधील हनीट्रॅपची नवीन टोळी उघड झाली आहे. पोलिसांनी त्या ट्रॅपवाल्या टोळीविरोधात खंडणी, जबरी चोरी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हनीट्रॅपच्या नवनवीन टोळ्या जिल्ह्यात उघडकीस येत आहे. वडगाव गुप्ता येथील टोळीत आतापर्यंत तरूणीसह तिच्या एका पंटरला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. ताब्यात घेतलेला संशयीत हाच त्या तरूणीचा खरा पंटर असून त्याला त्या तरूणीने आपला पती असल्याचे बागायतदाराल भासविले होते. यामुळे ताब्यात घेतलेल्या संशयितास आता या गुन्ह्यात अटक केेली जाणार आहे. दरम्यान, या टोळीने आणखी कोणाला या जाळ्यात ओढले याचाही पोलीस शोध घेत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com