
पारनेर|तालुका प्रतिनिधी| Parner
वाडेगव्हाण (Wadegavhan) बेलवंडी फाटा (Belwandi Phata) शिवारातील धक्कादायक घटना सोमवारी घडली. अवकाळी वादळी वार्यामुळे (Unseasonal Storm Wind) परिसरातील विज खंडित (Power Outage) झालेली होती. यावेळी गावकर्यांचा फोन आल्यानंतर वीज महामंडळाने वायरमन (Wireman) वीज दुरुस्तीसाठी वायरमन पाठवला. दम्यान विज दुरूस्ती करत असतांना वायरमन भरत कोल्हे यांचा विजेच्या खांबाला चिकटून मृत्यू (Electric Shock Death of Wireman) झाला. यावेळी कोल्हे यांचा मृतदेह अर्धातास खांबावर लटकून होता.
याबाबत स्थानिक नागरिक व पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, वाडेगव्हाण (Wadegavhan) शिवारातील शेळके यांच्या शेतातील विज पोलावर महावितरणचे वायरमन (MSEDCL Wireman) भरत कोल्हे काम करत असतांना अचानक विज पुरवठा सुरू (Power Supply Start) झाला. त्यामुळे कोल्हे यांना जोराचा विजेचा झटका (Electric Shock) झटका बसला. यामुळे त्यांचा मृत्यू (Death) झाला.
यावेळी सुमारे अर्धातास त्यांचा मृतदेह (Dead Body) विजेच्या खांबावर लटून होता. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे (Supa Police Station) पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले.