नेवाशातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

अर्धा किलो सोने हस्तगत
नेवाशातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील श्रीरामपूरातील बेलापूर, ऐनतपूर, निपाणी वडगाव, खोकरसह शिर्डी, शेवगाव, सोनई परिसरामध्ये शेतातील वस्तीवर दरोडे टाकून मारहाण करून लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे.

नेवासा तालुक्यातील या टोळीकडून अर्धा किलो सोन्याच्या दागिन्यांसह चांदी व अन्य सत्तावीस लाख ब्यान्नव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही टोळी सराईत गुन्हेगार असून या टोळीने तब्बल १२ दरोड्यांची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्यावर श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगावसह अन्यत्र वेगवेगळे तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत.

२३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री विराज उदय खंडागळे, (रा. बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर) हे आपल्या कुटुंबासह शेतातील बंगल्यामध्ये झोपलेले असताना दरोडेखोरांनी त्यांचे बंगल्याचा पाठीमागील दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करून लहान मुलाचे गळ्यास धारदार चाकू लावून व घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी देऊन घरातील सोने चांदीचे दागिणे तसेच रोख रक्कम असा एकूण २,८२,०००/-रु. किमतीचा ऐवज तसेच जवळच राहणारे सोमनाथ भागीरथ चिंतामणी यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांना मारण्याची धमकी देत त्याच्या घरातील २५,०००/ रु. रोख रक्कम असा एकूण ३,०७,०००/-रु. किमतीचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता. या घटनेबाबत श्रीरामपूर शहर पो. स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच यापूर्वीही श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगाव यापरिसरामध्ये अशा प्रकारचे दरोड्याचे गुन्हे घडलेले असल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमले.

पो.नि. अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बेलापूरचा दरोडा नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील सराईत गुन्हेगार सचिन भोसले व त्याच्या साथीदारांनी केलेला असून सचिन भोसले व त्याचा साथोदार अजय मांडवे हे चोरलेले सोन्याच्या दागिण्यांची | विल्हेवाट लावण्यासाठी पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट कारमधून आलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर त्वरीत स्थानिक गुन्हे शाखेचे व श्रीरामपूर शहर पोलिसांनी खाजगी वाहनाने सलाबतपूर येथे गेले. मिळालेल्या माहितीचे आधारे दरोडेखोरांचा शोध घेत असताना सलाबतपूर ते प्रवरा संगम जाणारे रोडवर डॉ. योगेश वरगंटवार यांच्या गोठ्याचे आडोशाला एका पांढरे रंगाचे कारजवळ दोन इसम संशयितरित्या उभे असलेले दिसले. पोलीस पथकाची खात्री झाल्याने पोलीस पथक त्यांचे | दिशेने जात असतानाच त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने त्यातील एक इसम बाजूस असलेल्या उसाचे शेतामध्ये पळून गेला, त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. एक इसमास कारसह जागीच ताब्यात घेऊन त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांस त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, पत्ता १) अजय अशोक मांडवे, वय २२ वर्ष, रा. सलाबतपूर, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन वरील नमुद गुन्ह्याबाबत व गुन्ह्यातील चोरलेल्या दागिण्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने दोन पंचासमक्ष त्याचे कारची झडती घेतली असता त्याच्या कारमधून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे तसेच १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे त्यामध्ये राणीहार, गंठण, मणीमंगळसूत्र, कानातील मुंबर, अंगठ्या, चेन, टॉप्स, नेकलेस, डोरले, कानातील वेल. बोरमाळ तसेच चांदीचे पायातील पैजण असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिणे तसेच स्विफ्ट कार व मोबाईल मिळून आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे.

ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांकडून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे, स्विफ्ट कार, ७ मोबाईल व दोन मोटार सायकली असा एकूण २७,९२,५००/-रु. किं. या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींचे सहा साथीदार फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

जबरी चोरी, घरफोडी चोरी, चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे अशा स्वरूपाचे पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी रामसिंग विक भोसले याचे विरुद्ध दाखल गुन्हे

१) नेवासा पो.स्टे गुरनं. १२५७/२०२१ भादवि कलम ३७९, २) नेवासा पो.स्टे. गुरनं. २१५/२०१५ भादवि कलम ३९५, ३) नेवासा पो.स्टे. गुरनं. २०३/२०१९, मादवि कलम ३९९, ४०२, ४) नेवासा पो.स्टे. गुरनं. १२२९/२००८ भादवि कलम ३९५,३४२, ५) नेवासा पो.स्टे. गुरनं. १२२३/२०१५ भादवि कलम ३९५ ६) नेवासा पो.स्टे. गुरनं. १२५७/२०१७ भादवि कलम ३९७, ३४१, ७) नेवासा पो.स्टे. गुरनं. १२२९/२००८ भादवि कलम ३९५, ३४२ ८) नेवासा पो.स्टे. गुरनं. १२०० / २०२० भादवि कलम ३०९, ९) नेवासा पो.स्टे. गुरनं. १८३९/२०१८ भादवि कलम ३२४,३२३,५०४,५०६, १०) नेवासा पो.स्टे. गुरनं ||२७६/२०१७ आर्म अॅक्ट कलम ३/२५.४/२५ ११) संगमनेर शहर पो.स्टे. गुरनं. २०९/२०२९ भादवि कलम ३०९, १२) वाकुंज पो.स्टे. औरंगाबाद गुरनं. ४०/२०१७ भादवि कलम ३९५ १३) सिलेगांव पो.स्टे. औरंगाबाद गुरनं. १४७/२०१०, भारवि कलम ३९५, ३९७, १४) नाशिक गुरनं. १५०/२०१३ भादवि कलम ३९५,४५१,५०६ १५) शेवगाव पो.स्टे. गुरनं. १२५४/२०१३ भादवि कलम ४५७, ३८०, ३९२, १६) एमआयडीसी पो.स्टे. औ. बाद गुरनं. १०५/२०१७ भादवि कलम ३९५ १७) एमआयडीसी पो.स्टे. ओ. बाद गुरनं. १२७६/२०१७ भादवि कलम ३९५, १८) गंगापूर पो.स्टे. औरंगबाद गुरनं. ४३/२०१३ भादवि कलम ३९६.४९२ १९) संगमनेर तालुका पो.स्टे. गुरनं. १५६/२०१५ भादवि कलम ३७९ २०) खेड पो.स्टे. पुणे गुरनं. १८०/२०२० भादवि कलम ४५७, ३८०, ३४ २१) नेवासा पो.स्टे. गुरनं. -२३१३/२०१३ भादवि कलम ३९२, ३४२ २२) आम्बी पो.स्टे. गुरनं. १५६/२०१५ भादवि कलम ३७९

आरोपी प्रथम सुरेश भोसले याचे विरुद्ध दाखल गुन्हे-

१) सिलेगाव पो.स्टे. औरंगाबाद गुरनं. १३९/२०२० भादंवि कलम ४५७, ३८०, २) सिलेगाव पो.स्टे. औरंगाबाद गुरनं. १३७ / २०२० भादंवि कलम ४ * ल, ३ ०, ३) पारनेर पो.स्टे. गुरनं. । २२३/२०१७ आर्म अॅक्ट कलम ४/२५, आरोपी बाळासाहेब ऊर्फ बयंग सुदमल भोसले याचे विरुद्ध दाखल गुन्हे, १) नेवासा पो.स्टे. गुरनं. २१५/२०१५ भादवि कलम ३९५ २) नेवासा पो. स्टे. गुरनं. २०३/२०१९, भादवि कलम ३९९, ४०२, ३) नेवासा पो.स्टे. गुरनं. ६०० / २०१७ भादवि कलम ३९५, ४२०, ४) सोनई पो.स्टे. गुरनं. ८८/२०१२ भादवि कलम ३९५, ४५२५) नेवासा पो.स्टे. गुरनं. ३९/२०१४ भादवि कलम ३९५, ३४२, ६) नेवासा पो.स्टे. गुरनं. २१६/२०१३ भादवि कलम ३९५, ४२०, ७) शेवगाव पो.स्टे. गुरनं. ४४/२०१८ भादंवि कलम ३७९.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके, सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, आण्णा पवार, बबन मखरे, विश्वास बेरड, विजय वेठेकर, भाऊसाहेब काळे, संदीप घोडके, दिनेश मोरे, पोना ज्ञानेश्वर शिंदे. सुरेश माळी, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष लोढे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ सागर ससाणे, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे, विनोद मासाळकर, रोहीत येतूल, मयूर गायकवाड, राहुल सोळंके, मेघराज कोल्हे, मच्छिन्द्र बर्डे, प्रकाश वाघ, आकाश काळे, विजय घनेघर, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, रोहीत मिसाळ, रवींद्र घुंगासे, सागर सुलाने, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर, बबन बेरड, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, अर्जून बढे, चापोना भरत बुधवंत व श्रीरामपूर शहर पोनि संजय सानप, पोसई कृष्णा घायवट, पोहेकॉ अतुल लोटके, पोना गणेश भिंगारदे, पोकाँ सुनिल दिघे, किशोर जायव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, श्रीरामपूर येथील सफौ राजेंद्र आरोळे, पोहेकाँ सुरेश औटी यांनी ही कामगिरी यशस्वी केली.

Related Stories

No stories found.