अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नेवाशातील मुळा आणि ज्ञानेश्वरपाठोपाठ पाथर्डीच्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचीही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.

कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे आणि आ. मोनिका राजळे यांच्यावर ऊसउत्पादक सभासदांनी विश्वास टाकला. नवनिर्वाचित संचालकांमध्ये अनेक नवीन चेहर्यांना संधी देण्यात आली आहे.

अप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धव रघुनाथ वाघ, अनिल शिवाजी फलके, साहेबराव गोपीनाथ सातपुते, सुभाष बाबूराव ताठे, श्रीकांत साहेबराव मिसाळ, बाबासाहेब रंगनाथ किलबिले, रामकिसन काशिनाथ काकडे, सुभाष मारुती बुधवंत, शरद हरिभाऊ अकोलकर, यशवंत निवृत्ती गवळी, बाळासाहेब भगवान गोल्हार, शेषराव सूर्यभान ढाकणे, राहुल अप्पासाहेब राजळे, काकासाहेब मुरलीधर शिंदे, सिंधुबाई महादेव जायभाय आणि आ. मोनिका राजीव राजळे, तसेच काशिनाथ खंडू बडवे आणि कोंडीराम रामजी नरोटे अशी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांची नावे आहेत.