मतदारयादीच्या कामाचा बीएलओ हा कणा

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांची नेवासा तालुक्यास भेट
मतदारयादीच्या कामाचा बीएलओ हा कणा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

निवडणूक विषयक मतदारयादीच्या कामाचा बीएलओ हा कणा असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

श्रीकांत देशपांडे यांनी नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आदी धार्मिक स्थळी भेट दिली. सदर दौर्‍यादरम्यान नेवासा तालुक्याच्या निवडणूक कामकाजाची माहिती घेतली. तालुक्यातील कामकाजाबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप यांचेसह मतदान कार्ड सोबत आधार लिंकींगचे 100 टक्के कामकाज करणार्‍या अंगणवाडी सेविका सविता नारायण दरंदले, प्राथमिक शिक्षक प्रवीण बाळासाहेब शिर्के व ग्रामसेवक अण्णासाहेब तुकाराम डेंगळे या बीएलओंचा गौरव केला.

निवडणूक विषयक मतदारयादीच्या कामाचा बीएलओ हा कणा असून नेवासा तालुका सप्टेंबर अखेरपर्यंत आधार लिंकिंगचे कामकाज पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार श्री. गोसावी, नायब तहसीलदार श्री. रोडे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com