मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

उपजिल्हाधिकारी पाटील: अद्यायावत मतदार याद्या प्रकाशित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उपजिल्हाधिकारी पाटील (Deputy Collector Patil) जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे (District Election Office) जिल्ह्यात सर्वत्र दिव्यांग आणि महिला मतदारांची नोंदणी (Registration of Disabled and Female Voters) करण्यासाठी विशेष मोहीम (Special campaign) राबविणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील (Deputy Collector and Deputy District Election Officer Jitendra Patil) यांनी दिली. 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, नुकत्याच अद्ययावत मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात एकूण 35 लाख 57 हजार 266 मतदार असून यामध्ये 18 लाख 50 हजार 954 पुरुष मतदार तर 17 लाख 06 हजार 127 स्त्री मतदार आणि 185 तृतीयपंथी मतदार आहेत. नव्याने मतदार नोंदणीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनातर्फे मतदार जनजागृती काम सुरु आहे. येत्या 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा साजरा करण्यात येणार्‍या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे शासनाचे निर्देश असुन त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com