प्रारूप मतदार याद्यांवर हरकती नोंदविण्याचे आवाहन

प्रारूप मतदार याद्यांवर हरकती नोंदविण्याचे आवाहन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या काल दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिध्द झाल्या आहेत. या प्रारूप मतदार याद्यांवर सर्वसामान्य नागरिकांनी दि. 18 ऑक्टोबर 2022 पूर्वी हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या खंडाळा, कमालपूर, माळेवाडी, वांगी बुद्रुक, वांगी खुर्द, उंबरगाव या ग्रामपंचायती तसेच नव्याने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि. 21 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द होणार आहे.

सदर प्रारुप मतदार यादी तहसील, पंचायत समिती, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिध्द केली जाणार आहे. या प्रारूप याद्यांवरील हरकती तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे लेखी स्वरुपात दि. 18 ऑक्टोबर 2022 पूर्वी नोंदवाव्यात, असे आवाहनही श्री.पाटील यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com