जिल्ह्यातील ५४ सहकारी संस्थांच्या मतदार यादी कार्यक्रम जाहीर, वाचा तालुकानिहाय यादी

जिल्ह्यातील ५४ सहकारी संस्थांच्या मतदार यादी कार्यक्रम जाहीर, वाचा तालुकानिहाय यादी

श्रीरामपूर | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम २०२१-२०२२ ते २०२६-२०२७ च्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नगर जिल्ह्यातील ५४ सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा १३ सप्टेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजीच्या दिनांकापासून तयार केलेल्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

यात श्रीरामपूर तालुक्यातील ६ सोसायट्या असून यात सर्वात कमी कोपरगावतील दोन तर सर्वात जास्त श्रीगोंद्यातील ११ सोसाट्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

या ५४ सोसायट्यांच्या मतदार यादी कार्यक्रमात २२ ऑक्टोबर २०२१ रोजी स. ११ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. यावर २२ ऑक्टोबर २०२१ ते १ नोव्हेंबर २०२१ सकाळी ११ ते दु. ३ वाजेपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती स्विकारल्या जातील. ११ नोव्हेंबर २०२१ दु.४ वाजता आलेल्या हरकतींवर निर्णय घेतले जाणार आहेत. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. या सर्व निवडणूक मतदार यादी कार्यक्रमाची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर व संबंधित उप / सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व संस्थेच्या कार्यालयात होणार आहेत.

मतदार यादी कार्यक्रम जाहीर झालेल्या जिल्ह्यातील सहकारी सोसायट्या पुढीलप्रमाणे

नगर तालुका

मारुती जांब विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., जांब, हिवरे बाजार विविध कार्यकारी सेवा संस्था मर्या., हिवरेबाजार, उक्कडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., उक्कडगाव, दरेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., दरेवाडी,

संगमनेर -

खांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., खांडगाव, निभांळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., निभांळे, चिंचोली गुरव पूर्वभाग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., चिंचोली गुरव, चिंचोली गुरव पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.. चिचोली गुरव, वेल्हाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., वेल्हाळे, वडगाव लांडगा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., वडगाव लांडगा, शिंदोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., शिंडोदी, स्व. अशोकराव मोरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., पिंपळगाव कोझिरा

अकोले -

तांभोळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., तांभोळ, चास विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., चास, वाशेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., वाशेरे,

कोपरगाव-

गोधेगाव नं. १. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., गोधेगाव, कोपरगाव प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.. कोपरगाव,

राहुरी -

श्रीराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., आरडगाव, दत्तात्रय विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., वळण, नारायण पा. खुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., वळण, कोपरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., कोपरे, चिंचविहीरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., चिंचविहीरे,

श्रीरामपूर -

अशोक सहकारी साखर कामगार पतपेढी लि., अशोकनगर, उंदीरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.. उंदीरगाव, श्री संत सावता माळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., टाकळीभान, कै. भाऊसाहेब शंकरराव पा. लबडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., श्रीरामपूर, अशोकराव पा. चौधरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., हनुमानवाडी, कारेगाव प्रगत बागायतदार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., कारेगाव, कारेगाव

नेवासा -

जयमल्हार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., महालक्ष्मी हिवरे, शिंगवे तुकाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, शिंगवे तुकाई, चांदगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., चांदगाव, सौंदाळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., सौंदाळा, गोणेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., गोणेगाव, हनुमान लोहारवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लोहारवाडी,

शेवगाव-

थाटे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., थाटे, सोनेसांगवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., सोनेसांगवी, वरखेड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., वरखेड, ठाकूर निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., ठाकूर निमगाव, सोनविहीर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., सोनविहीर, ढोरजळगाव- ने/मलकापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मलकापूर, विजयपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., विजयपूर, कर्जत बेनवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., बेनवडी, श्री भैरवनाथ औटेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., औटेवाड़ी,

श्रीगोंदा -

सिद्धेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., एरंडोली, सावित्रीबाई महिला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., पिंपळगाव पिसा, टाकळेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., टाकळीलोणार, जयमल्हार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., बेलवंडी कोठार, भानगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., भानगाव, चिखलठाणवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., चिखलठाणवाडी, हनुमानचांभोर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., ढगेवाडी, भवळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., भवळगाव, तुळजाभवानी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., सारोळा सोमवंशी, श्री चांडेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., चांडगाव व शनैश्वर देवदैठण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., देवदैठण.

प्रारुप मतदारयादीवर विहीत मुदतीत हरकती प्राप्त न झाल्यास अथवा किरकोळ स्वरुपाच्या हरकती असल्यास हरकती स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर लगेच मतदार यादी अंतिम करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com