समस्या निवारणार्थ तहसीलदार बोरुडेंच्या दालनात विवेक कोल्हे यांची बैठक

समस्या निवारणार्थ तहसीलदार बोरुडेंच्या दालनात विवेक कोल्हे यांची बैठक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहर व विधानसभा मतदारसंघातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच आणि सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष व नागरिकांच्या प्रलंबित समस्यांच्या निवारणार्थ तहसीलदार बोरूडेंच्या दालनात युवानेते विवेक कोल्हे यांनी बैठक घेतली.

याप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते. विवेक कोल्हे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र अपात्र ड यादीतील घरकुल लाभार्थ्यांना तसेच शासकीय स्तरावरील विविध योजनांचा लाभ तळागाळातील उपेक्षितांना मिळावा. नव्याने व दुबार शिधापत्रिका मिळाव्यात, आदी प्रलंबित समस्यांबाबत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. कोपरगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशूधन असून त्यांना लम्पीचे लसीकरण पूर्ण क्षमतेने होण्याबाबत तालुका पशुसंवर्धन अधिकार्‍यांना सूचना करण्यात आल्या.

नेमून दिलेल्या गावांना ग्रामसेवक व तलाठी उपस्थित रहात नाही. परिणामी नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले, उतारे तसेच विविध शासकीय योजनांसाठीची कागदपत्रे मिळण्यात अडचणी निर्माण होतात. बैठकीत आपेगांव पिण्यांच्या पाणीयोजनेसाठी जमीन, कोकमठाण, सडे, शिंगवे रस्त्याचे काम मार्गी लागावे, धोत्रे तळेगांव, घोयेगांव रस्त्याच्या वेड्याबाभळी काढाव्या, उक्कडगांव ग्रामपंचायत चौदावा व पंधराव्या वित्त आयोगातील विकास कामे मार्गी लागावी, उक्कडगांव जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनची वर्क ऑर्डर, खातेदारांचे निधीचे प्रस्ताव, धोत्रे-तळेगांव शिवरस्ता अतिक्रमण, पाचवस्ती व शेती रस्त्याचे काम, कालिंदीनगर ड्रेनेज काम, वीज व शेती पाटपाणी संदर्भात उदभवणार्‍या अडचणी, कोविड मयतांच्या वारसांना शासन वैद्यकीय मदत, काकडी गांव अंतर्गत व काकडी विमानतळ प्राधिकरणांची थकीत पटटी तर बहादरपूर चोंडीवस्ती रस्त्याचे अतिक्रमण काढ्न प्रलंबित विकास कामे मार्गी लागावी, म्हणून युवानेते विवेक कोल्हे यांनी चर्चा केली. ही सर्व कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार विजय बोरूडे यांनी दिले. याप्रसंगी शरद थोरात, पराग संधान, बाळासाहेब पानगव्हाणे, साहेबराव रोहोम, दत्ता काले, विजय वाजे, कैलास रावण राहणे, दीपकराव गायकवाड, प्रकाश किसन भाकरे, अशोकराव गवारे, विक्रम पाचोरे आदींसह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com