ग्रामपंचायत व सोसायटी राजकीय जिरवाजिरवी करिता नाही - कोल्हे

राहाता येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करणार
ग्रामपंचायत व सोसायटी राजकीय जिरवाजिरवी करिता नाही - कोल्हे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राहाता तालुक्यातीत व कोपरगाव मतदार संघातील पुणतांबासह 11 गावांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. म्हणून या गावातील प्रश्न व लोकसंपर्काकरिता राहाता येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करणार असून ग्रामपंचायत व सोसायट्या जिरवाजिरवीच्या राजकारणासाठी नसून गाव विकासासाठी आहे हे विसरू नका, असे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले.

राहाता तालुक्यातील 11 गावे कोपरगाव विधानसभा मतदार संघास जोडलेली आहेत. या गावातील सोसायट्या व ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार संजीवनी उद्योगाच्यावतीने जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी होते. प्रास्ताविकात विवेक कोल्हे यांनी आमदारकीच्या निवडणुकीत उभे राहण्याचे आवाहन चंद्रभान धनवटे यांनी केले.

विवेक कोल्हे म्हणाले, या परिसरातील 11 गावांत संपर्क वाढविणार असून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा हा परिसर कायम निवडणुकीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परदेशातील शिक्षणाचा प्रसंग सांगून स्विर्झलँडमध्ये घडाळ्याचा कारखाना सुरू करण्याचा मानस व्यक्त केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी गावातच काय करावयाचे ते करा आणि सुट बुटात वावरणारे कोल्हे धोतर वापर असे त्यांच्या विचारानेच 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करत आहोत.

1960 साली संजीवनी कारखाना सुरू करण्यात अडचणी कशा आल्या ते स्पष्ट करून गाळप क्षमता 800 वरून 5000 टन करून आता 6000 टन क्षमता होणार आहे. त्यामुळे परिसरातील उसाचे एकही टिपरू शिल्लक राहणार नाही. असे सांगून गणेश कारखाना या परिसराची कामधेनू आहे. परंतु सध्या तो पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत नाही, अशी नाव न घेता आ. विखे यांच्यावर बोचरी टीका केली.

कोपरगाव तालुक्यातील सर्व सहकारी संस्था उत्तमपणे सुरू आहे. अनेक रोजगार निर्माण केला स्व. शंकरराव कोल्हे यांचा सामाजिक वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी राजकारणात आलो आहे. स्व. शंकरराव कोल्हे स्पष्ट, निर्भिड व्यक्तिमत्व होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर पाणी प्रश्नावर संघर्ष केला. परंतु 2004 साली निवडून गेलेले आमदारांनी विधानसभेत प्रश्न विचारण्यासाठी तोंडच उघडले नाही. त्यांच्यामुळे कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी गेले. तरीही मूग गिळून बसले, असा आरोप माजी आमदार काळे यांच्यावर केला.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे व धनंजय जाधव यांनी 17 कोटींची पाणी योजना जागेसह मंजूर करून आणली. केवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यामुळे निकृष्ट काम झाले आहे. याचाही उल्लेख कोल्हे यांनी केला. कोपरगाव मतदार संघातील पुणतांब्यासह 10 गावांतील 8 सोसायट्यांत विजय मिळवला म्हणून पुणतांबा, वाकडीकरांचे विशेष कौतूक तर उपस्थितांना सोसायटी, ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय जिरवा जिरवाकरिता नसावी. विकासात्मक कामे व्हावी. चुकीचे होणार नाही याची काळजी घ्या. कारण सर्व पंच कमिटी जबाबदार राहणार आहे, असे आवाहन केले.

यावेळी शिवाजीराव लहारे, संपतराव चौधरी, धनंजय जाधव, सुभाष वहाडणे, दिनकरराव भोरकडे, सर्जेराव जाधव, सुधाकर जाधव, अशोक धनवटे, प्रकाश आरणे, जयंवतराव शिंदे, विक्रम वाघ, किसन बोरबणे, बाळासाहेब चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार गणेश बनकर यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com