पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उपक्रम शेतकर्‍यांना प्रेरणादायी- विवेक कोल्हे

विवेक कोल्हे
विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

भारत शेतीप्रधान देश असून येथील शेतकर्‍यांचे कृषी उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाच्या कृषी मंत्र्यांनी धडक योजना जाहीर करून त्याची थेट शेतकर्‍यांच्या बांधावर अंमलबजावणी केली आहे. पंतप्रधानांनी एक राष्ट्र एक खत योजनेचा शुभारंभ करून शेती विकासात मोलाची भूमिका बजावली असून या निर्णयाचे युवानेते विवेक कोल्हे यांनी स्वागत केले आहे.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे किसान सन्मान संमेलनात साडेतीन लाख किरकोळ खत दुकानांचे प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्रात रूपांतर करण्याची घोषणा करून त्यात एकाच ठिकाणी खत, बियाणे आणि माती पाणी परीक्षणाच्या सुविधा मिळणार आहे. शेती विकासाची साधनं बदलत आहेत. ग्रामिण भागातील घटकापर्यंत ती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे.

वन नेशन वन फर्टिलायझर या योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत युरिया बॅगचे लोकार्पण केले. स्वस्त आणि दर्जेदार खते यातून उपलब्ध केली जाणार आहे. शेतमालाला किफायतशीर भावासह स्वाभिमान शेतकरी योजनेतून पात्र शेतकर्‍यांना वर्षांकाठी आर्थिक मदतही दिली आहे. नॅनो युरियाचे उत्पादन हा कृषीक्रांतीचा मोलाचा टप्पा आहे. त्यातून उत्पादन वाढ साध्य करण्यासाठी आवश्यक मदत होणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने शेतकरी हिताचे असंख्य निर्णय घेऊन त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली आहे. जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा तयार झाली आहे. विकसित देशातील शेतकर्‍यांच्या तुलनेत विकसनशील देशातील शेतकरी तुल्यबळ ठरावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय कृषीमंत्री जाणीवपूर्वक प्रयत्न करत असून सर्व शेतकर्‍यांच्यावतीने विवेक कोल्हे यांनी केंद्र शासनाचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com